garbage Dainik Gomantak
गोवा

कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

मडगावात 5 हजार रुपये दंड आकारण्याची पालिकेची तयारी

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगावात कचऱ्याची विल्हेवाट प्रभावीपणे राबवण्याचे मडगाव पालिकेने ठरवले आहे. यापुढे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण न करता कचरा दिल्यास ५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मडगाव पालिकेने शनिवारी या आशयाची नोटीस जारी केली असून, ही पद्धती त्वरित कार्यान्वित केली जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांनाही दंड केला जाणार असल्याचे या त्यात म्हटले आहे. त्यामुळे कचराप्रश्नी मडगाव पालिका चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आहे.

मडगावात पालिकेतर्फे घरोघर जाऊन कचऱ्याची उचल केली जाते. मात्र बऱ्याच वेळा लोक ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकाच बरोबर देतात, असे लक्षात आले आहे. त्याशिवाय कित्येक ठिकाणी लोक रस्त्यावर कचरा फेकून देत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मडगावात कित्येक ठिकाणी उकिरडे निर्माण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

Goa Assembly Election 2027: भाजप-मगोप युतीचेच सरकार राज्यात पुन्हा येणार, सदानंद शेट तानावडेंनी व्यक्त केला विश्वास; विकासाला मिळणार नवी गती

Dharbandora Water Crisis: धारबांदोड्यात गढूळ पाणीपुरवठा, शिवडेवासीयांचे आरोग्य धोक्यात; रगाडा नदीपात्रातील कामाचा परिणाम

SCROLL FOR NEXT