Garbage Problem in Madgaon Dainik Gomantak
गोवा

हायटेक क्लिनिंग; मडगावातील कचरा साफ करण्यासाठी आता व्हॅक्युम यंत्रांची मदत

मडगावात उघड्यावर टाकण्यात येत असलेला कचरा प्रशासनासमोर मोठं आव्हान

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव परिसरात उघड्यावर टाकण्यात येत असलेला कचरा सध्या प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरु लागलं आहे. याच कचऱ्याची उचल करण्यासाठी मडगाव नगरपालिकेने व्हॅक्युम तंत्रज्ञानावर कचरा गोळा करणारी मशिन खरेदी करण्याचा विचार सुरु केला आहे . या व्हॅक्युम मशिनची किंमत सुमारे 29 लाख रुपये असून या मशिनद्वारे कचरा गोळा करण्याचे प्रात्यक्षिक सोमवारी मडगावात दाखवण्यात आले.

मडगाव परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा आणून टाकण्याचे प्रकार अनोळखी इसमाकडून घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी या व्हॅक्युम मशिनचा वापर करणे सोयीचे ठरणार आहे. प्रात्यक्षिकावेळी मडगावचे आमदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत, मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन परेरा आणि नगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले की, या मशीनचा वापर करण्यासाठी एक चालक आणि कुशल कामगार लागणार आहे. या यंत्राद्वारे 10 ते 15 मिनिटात एका ब्लॅक स्पॉट जागेचा कचरा साफ करणे शक्य आहे. या वेळी नगराध्यक्ष परेरा यांनी सांगितले की मडगाव आणि फातोर्डा परिसरातील ब्लॅक स्पॉट कचरा गोळा करण्यासाठी या मशीनचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एक याप्रमाणे मडगावात किमान दोन मशिनची आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT