Madgaon Municipality Documents Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेतील दस्तऐवजावर चढली धूळ

नगराध्यक्ष लिंडन परेरा यांचे लक्ष नसल्याचा नगरसेवकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातील अव्वल दर्जाची नगरपालिका म्हणून जिचा एकेकाळी नावलौकिक होते त्या मडगाव पालिकेची आज दैना झालेली आहे. महत्त्वाचे दस्तावेज सांभाळून ठेवण्याची पुरेशी सोय नसल्याने ते उघड्यावरच टाकून दिले आहेत.

मडगाव पालिकेच्या सज्जात ही कागदपत्रे टाकून देण्यात आली असून, त्यामुळे खुद्द नगरपालिका इमारतीतच उकिरडा निर्माण झाला आहे. याशिवाय जन्म मृत्यू दाखले ज्या कक्षात ठेवले जातात तिथेही कागदपत्रे उघड्यावरच टाकून दिल्याने आणि तिथे दारे खिडक्या उघड्याच ठेवल्या जात असल्याने पावसात पाण्याचा झोत आत शिरून ही कागदपत्रे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी या परिस्थितीवर तीव्र नापसंती व्यक्त करताना नगराध्यक्ष लिंडन परेरा यांचे कारभारावर लक्ष त्यामुळे पालिकेची अशी दैना झाल्याचा आरोप केला.

दरम्यान काल रात्री नगरसेवक ज्या कक्षात बसतात त्या कक्षाच्या छपराचा काही भाग तुटून पडण्याची घटना घडली. ही घटना रात्रीच्यावेळी झाल्याने मोठा अनर्थ घडला नाही. जर ही दुर्घटना सकाळच्या वेळी घडली असती तर नगरसेवक जखमी झाले असते अशी प्रतिक्रिया बार्रेटो यांनी व्यक्त केली.

मडगाव पालिकेची ही इमारत बाहेरून चांगली वाटत असली तरी आतून मोडकळीस आली आहे. कित्येक ठिकाणी खिडक्या निखळून पडल्या आहेत. या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे मात्र नगराध्यक्ष मागचे वर्षभर झोपा काढत आहेत, अशी टीका त्यांनी केली. मडगाव पालिकेची मागच्या वर्षभरात रंगरंगोटीही केलेली नाही त्यामुळे या वारसामूल्य असलेल्या इमारतीची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT