Madgaon BJP Corporator with CM Pramod Sawant
Madgaon BJP Corporator with CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार बिनविरोध

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Mayor Election : नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करत काढलेल्या नव्या अध्यादेशानंतर आता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या पुरस्कृत नगरसेवकांना भाजपात सामावून घेण्यात आले. या आठ नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपसाठी मडगाव नगराध्यक्षपदाचा मार्ग सुखकर झाला आहे. तर मुख्य विरोधक असलेल्या आमदार विजय सरदेसाई यांनी उमेदवार न करण्याची भूमिका घेतल्याने 12 ऑक्टोबरची निवडणूक बिनविरोध होण्याचे जवळपास निश्‍चित आहे.

काँग्रेस आमदारांच्या 14 सप्टेंबरला झालेल्या घाऊक पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीवर मडगाव नगरपालिकेत भाजपला मोठा झटका बसला होता. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक घनःश्याम शिरोडकर यांनी गोवा फॉरवर्ड आणि इतर नगरसेवकांच्या मदतीने भाजप उमेदवार दामोदर शिरोडकर यांना पराभूत केले. मात्र, यानंतर ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेत भाजपने मडगाव पालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न सुरू केल होते. अविश्‍वास प्रस्ताव, नवा अध्यादेश आणि आता नगरसेवकांचा भाजप प्रवेश हा यातील मुख्य भाग ठरला. मात्र, यावर विरोधकांनी सातत्याने टीका करत सत्ताधारी भाजप सत्तेच्या सहाय्याने लोकशाहीची गळा दाबत असल्याचा आरोप केला आहे.

7 ऑक्टोबरला वटहुकूम जाहीर केल्यानंतर काँग्रेस पुरस्कृत 7 आणि गोवा फॉरवर्डच्या एका नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला. यामुळे भाजपला 25 पैकी 17 नगरसेवकांचे संख्याबळ जमा करण्यात यश आले आहे. या सर्व घडामोडींमुळे मडगाव नगरपालिका नगराध्यक्षपद भाजपकडे येण्याच्या अडचणी संपल्यात जमा आहेत.

यांनी केला भाजप प्रवेश

भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत दामोदर शिरोडकर, दामोदर परब, दीपाली सावळ, सिताराम गडेकर, सगुण नाईक, लता पेडणेकर, सेंड्रा फर्नांडिस या काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांसह राजू नाईक या गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला. 16 सप्टेंबरला क्रॉस व्होटिंग झाल्याने आता या नगरसेवकांना रीतसर भाजपात प्रवेश देण्यात आला.

विजय सरदेसाई यांचा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार

राज्यात भाजपने रडीचा डाव सुरू केला आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने सत्ता हवी आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. भाजपकडून लोकशाहीची हत्या सुरू आहे. त्यामुळे आम्ही नगराध्यपदाच्या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहणार आहोत. आमचा त्यावर बहिष्कार असेल, असं गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान लोकशाहीमध्ये बहुमताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक बहुमताचा आकडा, त्यांचीच सत्ता हा नियम आहे. बहुमताच्या आधारे कायदा निर्मिती अथवा कायदा बदल करता येतो, ही लोकशाहीचीच परंपरा आहे. त्यामुळे यात कुठेही लोकशाहीचा खून वगैरे होत नाही, असं वक्तव्य भाजप आमदार दिगंबर कामत यांनी केलं आहे.

आज ठरणार उमेदवार

12 ऑक्टोबरला नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजपचा उमेदवार अद्याप अनिश्चित आहे. मात्र, मुळ भाजपचे किंवा भाजपत नव्याने दाखल झालेल्या नगरसेवकांपैकी एकाच्या नावावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती भाजप सूत्राने दिली आहे. तर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार घातला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT