Meeting in Madgaon Municipality  Dainik Gomantak
गोवा

मडगावसह फातोर्डा आता सीसीटीव्ही निगराणीखाली येणार

नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी मागितला बंद कमेऱ्यांच्या स्थितीबद्दल आठ दिवसात अहवाल

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण मडगाव आणि फातोर्डा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याच्या महत्वाकांशी प्रकल्पावर आज सोमवारी मडगाव पालिकेत बैठक झाली.

नगराध्यक्ष लिंडन परेरा यांच्यासह वाहतूक पोलीस निरीक्षक गौतम साळुंके, पालिका मुख्याधिकारी रोहित कदम आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने भाग घेतला होता. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्याधिकारी कदम यांनी सध्या हा प्रस्ताव प्राथमिक अवस्थेत असून यासाठी खासदार निधी योजनेतून पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान मडगाव शहरात जे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत त्यांची तपासणी करून त्यात नेमक्या कोणते दोष आहेत त्यांची तपासणी करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश आज कॅमेरा कंपनीच्या प्रतिनिधीला देण्यात आले अशी माहिती कदम यांनी दिली. मडगाव शहरात सध्या 11 मोक्याच्या ठिकाणी 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 2020 साली बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यापैकी बरेच कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT