Madgaon Uprising Memorial Dainik Gomantak
गोवा

Madgaon Uprising Memorial: मडगावात पहिल्या उठावाचे स्मारक उभारा; वारसाप्रेमी डॉ. नंदकुमार कामत! मंत्री दिगंबर कामत यांना निवेदन

Heritage Conservation Goa: गोव्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकार पुरस्कृत उमेदवार निवडून यावा यासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यावर २१ सप्टेंबर १८९० या दिवशी सासष्टीच्या लोकांनी त्या विरोधात उठाव केला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: पोर्तुगीज सरकारच्या दडपशाही विरोधात गोव्यातील स्थानिकांनी केलेला पहिला उठाव म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या मडगावच्या २१ सप्टेंबर हत्याकांडातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ गोवा सरकारने होली स्पिरीट चर्च चौकात स्मारक उभारावे, अशी मागणी इतिहास आणि वारसाप्रेमी डॉ. नंदकुमार कामत यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केली आहे. आज त्यांनी यासंबंधीचे निवेदन कामत यांना सादर केले.

गोव्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकार पुरस्कृत उमेदवार निवडून यावा यासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यावर २१ सप्टेंबर १८९० या दिवशी सासष्टीच्या लोकांनी त्या विरोधात उठाव केला होता. सरकारी दडपशाहीचा विरोध करण्यासाठी मडगाव येथील होली स्पिरीट चर्च चौकात जमलेल्या सुमारे ४००० नागरिकांवर त्यावेळी पोर्तुगीज सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने २३ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. गोव्याच्या नागरी चळवळीच्या आणि राजकीय इतिहासात या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

या ऐतिहासिक घटनेच्या तसेच त्यावेळी झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक बांधकाम खात्याने एक स्मारक उभारावे अशी मागणी या निवेदनात केली आहे. यासाठी त्वरित तज्ञांच्या समितीकडून एक सुंदर असा आराखडा बनवून घेऊन हे स्मारक विनाविलंब उभारावे, अशी मागणी केली आहे.

१३७ वर्षांपूर्वी निष्पाप नागरिकांवर गोळीबार

१३७ वर्षांपूर्वी २१ सप्टेंबर या ऐतिहासिक दिनी निष्पाप नागरिकांवर जो गोळीबार झाला, त्यातील काही गोळ्या होली स्पिरीट चर्चजवळ असलेल्या डॉ. साल्वादोर आल्वारीस यांच्या घराच्या भिंतीत घुसल्या होत्या. या गोळ्या घुसलेल्या जागेला तांब्याच्या कोंदणात स्मृती म्हणून जपून ठेवण्यात आल्या आहेत याकडेही डॉ. कामत यांनी लक्ष वेधले असून या ऐतिहासिक घराची खासगी कुटुंबाकडून देखभाल केली जाते. या ऐतिहासिक घटनेची जाणीव नव्या पिढीला मिळावी यासाठी या जागेची ऐतिहासिक स्मारक म्हणून जपणूक करण्याची गरज असून सरकारी मदतीशिवाय ते करणे अशक्य आहे, असे डॉ. कामत यांनी म्हटले आहे.

ठरावासाठी दिले होते निवेदन

डॉ. कामत यांनी यासंबंधी २०२५ च्या जून महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक खासगी ठराव मांडावा यासाठी २३ जून २०२५ या दिवशी मंत्री कामत यांना लेखी निवेदन दिले होते. २१ सप्टेंबर २०२५ च्यापूर्वी हे स्मारक उभारावे अशी मागणी केली होती, पण त्या मागणीकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, अशी खंत व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT