Cyclone  Dainik Gomantak
गोवा

Goa Cyclone Biparjoy: ‘बिपरजॉय’मुळेच गोव्‍यात सध्‍या ऊन-पावसाचा खेळ : एम. रमेशकुमार

राज्यात 22 जूननंतर जोरदार पाऊस शक्य

दैनिक गोमन्तक डिजिटल

Cyclone Biparjoy In Goa Update: गोव्‍यात मॉन्‍सून सक्रिय होऊनही अद्याप पावसाने जोर धरलेला नाही, हा अरबी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम आहे. त्‍यामुळेच ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे, अशी माहिती हवामान अभ्‍यासक डॉ. एम. रमेशकुमार यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली.

दरम्‍यान, चक्रीवादळाचा थेट परिणाम गोव्‍यावर होणार नसला तरी समुद्र खवळलेला असून, उंचच उंच लाटा उसळत आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

हवामान विभागाने (IMD) रविवारी मॉन्‍सून सक्रिय झाल्‍याचे जाहीर केले; तथापि त्‍यानंतरही पावसाच्‍या हलक्‍या सरीच सुरू आहेत. त्‍यामुळे अनेकांनी आश्‍‍चर्य व्‍यक्‍त केले आहे. यासंदर्भात हवामान तज्‍ज्ञांनी नेमके कारण विषद केले आहे.

डॉ. रमेशकुमार म्‍हणतात, मान्‍सून सक्रिय झाल्‍यानंतर तत्‍काळ दमदार पर्जन्‍यवृष्‍टी होतेच, असे कोणतेही गृहीतक नाही. भौगोलिक परिस्‍थितीनुरूप दृश्य स्वरूपात त्‍याचे साधक-बाधक परिणाम दिसून येतात.

गोव्‍यात 22 जूननंतर जोरदार पाऊस सुरू होईल, असा अंदाजही डॉ. रमेशकुमार यांनी वर्तविला आहे. दरम्‍यान, हवामान विभागाने मॉन्‍सून सक्रिय झाला आहे, यात कोणतीही दुविधा नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले असून, राज्‍यभरात नोंद झालेले पर्जन्‍य हे समाधानकारक असल्‍याचे म्‍हटले आहे.

सामान्यतः जुलै व ऑगस्‍ट हे दोन महिने मोठ्या पावसाचे मानले जातात. या दोन महिन्‍यांत सर्वाधिक पाऊस नोंदला जातो.

25 टक्‍के पावसाची तूट

केरळमध्‍ये आठ दिवस उशिरा दाखल झालेला पाऊस राज्‍यात केवळ ३ दिवसांत म्‍हणजे १० जूनला दाखल झाला. गोव्‍यात यंदाच्‍या हंगामात आतापर्यंत सरासरी १०४.३ मिमी पावसाची नोंद अपेक्षित होती. मात्र, प्रत्‍यक्षात ७८.२ मिमी पाऊस झाला आहे. ही पावसाची २५ टक्‍के तुट आहे.

समुद्रात उतरू नका!

‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे गोव्यात मंगळवारपर्यंत समुद्राला भरती येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, आपत्कालीन स्थितीसाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. नागरिक, पर्यटकांना समुद्रात न जाण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

समुद्र खवळला, उंचच उंच लाटा, सतर्कतेचा इशारा

डॉ. रमे‍शकुमार म्‍हणतात...

  • अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची दिशा थोड्याबहुत फरकाने बदलत राहिली. त्‍यामुळे नैऋत्‍य मॉन्‍सून वाऱ्यांना अपेक्षित गती मिळाली नाही आणि पोषक वातावरण तयार होण्‍यात व्‍यत्‍यय आला.

  • चक्रीवादळ गुजरात व पुढे पाकिस्‍तानच्‍या दिशेने मार्गस्‍थ होईल. या प्रक्रियेदरम्‍यान १५ जून उजाडेल. त्‍यानंतर वादळ जमिनीवर येईल आणि तेव्‍हा नैऋत्‍य मोसमी वाऱ्यांचा मार्ग अधिक प्रशस्‍त होईल.

  • जूनमध्‍ये बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण व्‍हावा लागतो. त्‍यामुळे गोव्‍यात उत्तम पर्जन्‍य होण्‍यास मदत होते. २० जूननंतर पूर्व किनारपट्टीवर तसे बदल घडून येतील. म्‍हणजेच गोव्‍यात २२ जूननंतर मुसळधार पर्जन्‍यवृष्‍टी होईल.

गुजरात दक्ष

अतितीव्र बिपोरजॉय हे चक्रीवादळ गुरुवारी (ता. १५) दुपारी गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने वादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकार सज्ज झाले आहे.

किनारपट्टीवरील शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT