lying in the wall calf  Dainik Gomantak
गोवा

Siolim News : सडये येथील मरणासन्न वासराला महिलेकडून जीवदान

वरचावाडा येथे गायीचे वासरू ४० फूट खोल विहिरीत पडल्याची बातमी क्षणार्धात वस्तीत पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim News : शिवोली, सडये येथील वरचावाडा येथे बुधवारी रात्री कठडाहिन खोल विहिरीत पडलेल्या वासराला अग्निशमन जवानांनी बाहेर काढताच ते अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसले. त्यानंतर वस्तीतील सर्व लोकांनी घरी जाणे पसंद केले.

पण अर्चना नागवेंकर यांनी जीवदान देणारच असा निर्धार करून वासरू घरी नेले.पहाटेपर्यंत महत्प्रयासाने वासराला जीवदान देताच उपस्थित साऱ्यांचे आणि वासराची वाट पहात अंगणात ठिय्या मांडलेल्या गाईचेही डोळे पाणावले.

वरचावाडा येथे गायीचे वासरू ४० फूट खोल विहिरीत पडल्याची बातमी क्षणार्धात वस्तीत पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली.परंतु विहिरीत उतरण्याचे कुणालाच धाडस होईना. शेवटी पंच सदस्य सचिन मांद्रेकर यांनी म्हापसा अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले.

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वासराला बाहेर काढले. परंतु ते वासरू शेवटच्या घटका मोजत असल्याचे लक्षात आल्याने वस्तीतील सगळे घरी परतले.

पण अर्चना नागवेंकर यांनी वासराला जीवदान देणारच, असा निर्धार करून वासराला घरी नेले. पहाटेपर्यंत उपचार करून त्याला जीवदान दिले.

... अन् साऱ्यांचे डोळे पाणावले

यांचे प्रयत्न सुरू असतांनाच पहाटे साडेतीनच्या सुमारास वासराची किंचितशी हालचाल दिसली आणि त्या चकित झाल्या. यावेळी संपूर्ण रात्र झोप टाळून वासराची काळजी घेणाऱ्या त्या मातेचे काळीज भरून आले.

जवळच असलेल्या माहेरच्या लोकांना त्यांनी तात्काळ हाक मारून जागे केले व क्षणाचाही विलंब न लावता वासराला बाटलीद्वारे दूध पाजले. वासराने डोळे उघडताच, मातेला (गायीला) हाक दिली. झाल्या प्रकाराने सर्वांचेच डोळे पाणावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT