lure of big deals Cheated on a woman for millions of rupees
lure of big deals Cheated on a woman for millions of rupees Dainik Gomantak
गोवा

मोठ्या कंत्राटाच आमिष; महिलेला लाखांचा गंडा

दैनिक गोमन्तक

‘बीपीसीएल’ या कंपनीचे लाँड्री वॉशिंगचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून पर्वरीतील एका महिलेला 2.78 लाखांना गंडा घातलेला संशयित मिनारूल इस्लाम मुनताज अली याला सायबर कक्षाचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या पथकाने अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. (lure of big deals Cheated on a woman for millions of rupees)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मिनारूल अली याने तक्रारदार महिलेला फोन करून ‘बीपीसीएल’ कंपनीचे लाँड्री वॉशिंगचे कंत्राट देण्याचे आमिष दाखविले. तसेच कंपनीचे मोठे कंत्राट मिळेल असे सांगितले. या कंत्राटासाठी निविदा शुल्क म्हणून 1.38 लाखांचे ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगून बँकेचा खातेक्रमांक दिला. तिने ही रक्कम त्‍याच्‍या बँक खात्‍यात जमा केली. मात्र मिनारूलने सदर रक्कम खात्यावर खात्‍यावर जमा झाली नसल्याचे सांगितले व पुन्हा ती पाठवण्याची विनंती केली. या महिलेने पुन्हा 1.38 लाख रुपये पाठवले. ही रक्कम मिळाल्यानंतर तिला कंत्राटाबाबतचा व्यवहार ईमेलवरून केला जाईल असे आश्‍वासन दिले. तक्रारदार महिला संशयित मिनारूल याला ओळखत नव्हती, तरीही तिने हा व्यवहार केला होता.

अनेक महिने उलटून गेले तरी संशयिताकडून कोणताच फोन आला नाही तसेच कंत्राटाबाबत ईमेलही आला नाही. त्यामुळे तिने त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो फोन घेत नव्हता. या व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने सायबर विभागाकडे (Cyber ​​Department) तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर केलेल्या शोधकार्यात संशयित कळंगुट येथे असल्याची माहिती मिळाली. त्याला काल रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. चौकशीवेळी त्याने मूळ पश्‍चिम बंगाल येथील असल्याचे उघड केले. गेल्या काही महिन्यांपासून कळंगुट येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवतो अशी माहिती त्‍याने दिली. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT