Luisin Falero  Dainik Gomantak
गोवा

कोणतेही पद दिले तरी मला पर्वा नाही: लुईझिन फालेरो

तृणमूल पक्षाच्या फेरबदलावर तीव्र प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

पणजी: तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केल्याच्या बातमीने गोव्यात खळबळ उडाली. गोव्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे बदल करण्यात आले आहेत. लुईझिन फालेरो यांनाही या बदलाबाबत अंधारात ठेवण्यात आले आहे.

‘तृणमूल काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर बदल करण्यात येत आहेत, परंतु मला त्यात स्थान मिळाले नाही तरी पर्वा नाही. कॉंग्रेस पक्षात असतानाही मी पदाची कधी अभिलाषा बाळगली नाही. राहुल गांधी यांनाही मला कोणतेही पद नको हे स्पष्टपणे कळवले होते’, अशी माहिती लुईझिन फालेरो यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

लुईझिन फालेरो पुढे म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल अपेक्षित आहेत. पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना चेअरमन नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे नवीन समिती करण्याचे अधिकार आहेत. जेव्हा जेव्हा कोणत्याही पक्षात अध्यक्ष नेमला जातो, तेव्हा त्यांच्या खालील जुनी समिती आपोआप बरखास्त होते. त्यानुसार यापूर्वीची संपूर्ण समिती बरखास्त झालेली आहे.

फालेरो पुढे म्हणाले, ‘चार दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे सुचविण्यासाठी काही सदस्यांची एक अस्थायी समिती नियुक्ती केली आहे. ही समिती अध्यक्षांना नवीन पदाधिकाऱ्यांबाबत मार्गदर्शन करणार आहे, परंतु मला नवीन समितीत स्थान मिळाले नाही तरी मला पर्वा नाही.’

तृणमूलची मुख्य कार्यकारिणी विसर्जित

तृणमूल पक्षाने आपली मुख्य कार्यकारिणी समिती विसर्जित केली आहे. या समितीवर आता अभिषेक बॅनर्जी सरचिटणीस म्हणून राहणार नाहीत. डेरेक ओब्रायन यांचेही नाव नवीन कार्यकारिणी समितीत नाही, परंतु ते दुसऱ्या टप्प्यातील यादीत येऊ शकते. कार्यकारी समितीमध्ये एक व्यक्ती एक पद स्वीकारण्यापेक्षा खासदारांवर अधिक संसदीय जबाबदाऱ्या असतील. काही महिन्यांत येऊ शकणाऱ्यांसाठी आणखी पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून तृणमूल पुढे आणताना पक्षाच्या भूमिकेत बदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून पक्षीय घटनात्मक बदल देखील होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT