Madgaon Fest Dainik Gomantak
गोवा

मडगाव फेस्ताच्या फेरीला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद

नुकत्याच सुरु झालेल्या शाळेमुळे पालक मुलांच्या शाळेच्या साहित्याच्या खरेदीकडे व्यस्त असल्याचा परिणाम

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव येथील ओल्ड मार्केट येथे लावण्यात आलेल्या फेस्ताच्या फेरीला ग्राहकाकडून अल्प प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले. नुकत्याच सुरु झालेल्या शाळेमुळे पालक मुलांच्या शाळेच्या साहित्याच्या खरेदीकडे व्यस्त असल्याने याचा परिणाम या फेस्ताच्या फेरी वर झाला असल्याचे बोलण्यात येत आहे .

या फेरीचे आयोजन 5 जून पासून करण्यात आले आहे. या ठिकाणी मुलांची खेळणी, कपडे , फर्निचर , सुकी मासळी सहित इतर प्रकरणाची दालने खलु कऱण्यात आली आहे . रविवारी सुट्टी असल्याने या फेस्ताच्या फेरीला मोठ्या प्रमाणात ग्राहक येणार असल्याचे येथील दुकान्दाराणी गृहीत धरले होते याच दरम्यान मुलांच्या शाळा सुरु झाल्या असल्याने पालकांनी आपल्या मुलांचे शाळेचे साहित्य खरेदी करण्याकडे कल दिला आहे . येथील फेरी आणखी तीन चार दिवस असणार असल्याने यापुढे तरी ग्राहक फिरकणार का याची चिंता येथील दुकानदारांना सतावत आहे.

भाडे न देणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मडगाव नगरपालिकेने फेस्ताच्या फेरीत लावण्यात आलेल्या दुकानदारांनी भाडे न भरलेल्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ते वसूल करण्यात आले. या कारवाईत नगरपालिकेच्या मार्केट इन्स्पेक्टरनी ही कारवाई केली. या कारवाईत अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाचे दरानुसार भाडे दिले या पुढे हे भाडे देण्यात असमर्थ ठरलेल्या दुकानदाराना आपली दुकाने या ठिकाणाहून हटविण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांनी सांगितले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT