Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: लव्ह ट्रँगल, धोका आणि खून! पिळर्ण-पर्वरीत युपीच्या तरुणाची हत्या, पाचजण ताब्यात

Goa Murder Case: पिळर्ण-पर्वरी ऑडिट भवनजवळ मंगळवारी (दि.16) 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

Pramod Yadav

Goa Murder Case

पिळर्ण-पर्वरी ऑडिट भवनजवळ मंगळवारी (दि.16) 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी नवा खुलासा समोर आला असून, सलूनमध्ये कामाला असणाऱ्या या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा खून लव्ह ट्रँगलमधून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रेहबर खान (21, अमरोहा, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, तो एका सलूनमध्ये कामाला होता. मंगळवारी त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत पिळर्ण-पर्वरी येथील ऑडिट भवनजवळ आढळून आला होता.

रेहबरच्या चुलत भावाने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांने घटनेबाबत माहिती दिली आहे. रेहबरच्या एका मुलीच्या प्रेमात होता, दरम्यान यात प्रकरणात लव्ह ट्रँगल असल्याने त्याला मारहाण करण्यात आली. यात रेहबरचा मृत्यू झाला व नंतर मृतदेह पिळर्ण-पर्वरी ऑडिट भवनजवळ फेकून देण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून, सदर घटनेबाबत त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, यात आणखी काहीजणांना ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT