romantic triangle violence Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Sangolda love triangle news: सांगोल्डा येथे प्रेमसंबंधातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Akshata Chhatre

म्हापसा: सांगोल्डा येथे प्रेमसंबंधातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी साळगाव पोलिसांनी साईराज मोरजकर (रा. साळगाव) याला मारहाण केल्याबद्दल आकाश (रा. पर्रा) नावाच्या संशयित युवकासह त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही फिर्यादी साईराज आणि संशयित आकाश यांच्यात याच कारणावरून दोन-तीन वेळा वाद झाले होते.

शनिवार, २ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सांगोल्डा येथील फुटबॉल मैदानाजवळ ही घटना घडली. साईराज आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी आला असता, तिथे संशयित आकाश आणि त्याची प्रेयसी दुचाकीवरून आले. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संशयित आकाशने साईराजला लाथ मारून दुचाकीसह रस्त्यावर पाडले. दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

मारहाणीत जखमी झालेल्या साईराजला १०८ रुग्णवाहिकेतून तात्काळ म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मध्यरात्री त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने साळगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! मूर्ती स्थापनेचे नियम आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

"मी चर्चमध्ये जाणं सोडलं; माझा हरवलेला सन्मान कोण परत देणार?" निर्दोष सुटल्यानंतर माविन नेमकं काय म्हणाले?

Margaon: खुल्या जागेत मासेविक्री नको, आरोग्य केंद्राकडून पालिकेला निर्देश; मोकळ्या जागेचा होतोय गैरवापर

SCROLL FOR NEXT