Sunburn goa Dainik Gomantak
गोवा

'सनबर्नला'चे समर्थक तोंडघशी! लोटली ग्रामसभेत महोत्सवाच्या विरोधात ठराव मंजूर

Goa Sunburn: सनबर्न महोत्सव, कचरा प्रकल्प आणि रोमी कोकणी हे प्रमुख तीन विषय अजेंड्यावर घेऊन लोटली पंचायतीने ही खास ग्रामसभा बोलवली होती

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: खास सनबर्न महोत्सव आयोजनाचा विषय अजेंड्यावर घेऊन आयोजित केलेल्या लोटलीच्या विशेष ग्रामसभेत ड्रग्सच्या धास्तीमुळे लोटली किंवा वेर्णा येथे सनबर्न महोत्सव आयोजित करण्यास विरोध दर्शविणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ‘सनबर्न’ समर्थक तोंडघशी पडले.

तसेच वेर्णा पठारावरील प्रस्तावित कचरा प्रकल्पालाही विरोध करण्यात आला. कोकणी रोमी लिपीला देवनागरीबरोबर समान दर्जा देण्याची मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला. आजच्या ग्रामसभेत या तिन्ही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, सनबर्न महोत्सव, कचरा प्रकल्प आणि रोमी कोकणी हे प्रमुख तीन विषय अजेंड्यावर घेऊन लोटली पंचायतीने ही खास ग्रामसभा बोलवली होती. मात्र, ग्रामस्थांनी ‘सनबर्न’ला आक्षेप नोंदवत अन्य विषयांवर साधक-बाधक चर्चा केली.

बोरी पुलाचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. सुरवातीला नव्या बोरी पुलाला ठाम विरोध दर्शविला. पण नंतर बोरी पूल हवा; पण खाजन शेती नष्ट होता कामा नये, अशी भूमिका घेतली.

रोमी लिपीबद्दल परेरा यांनी सांगितले की, यापूर्वी ४० ग्रामसभांमध्ये कोकणी रोमी लिपीला समान दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आज घेतलेल्या ठरावाप्रमाणे आम्ही पंचायतीद्वारे आमच्या भावना भाषिक अल्पसंख्याक कमिशनरला कळविणार आहोत, असेही परेरा यांनी सांगितले.

वेर्णात ‘सनबर्न’साठी अर्ज नाही; आलेक्स

मी स्वत: सनबर्न आयोजनाच्या विरोधात आहे. पण लोक उगाच माझ्यावर टीका करतात. किटल येथील त्यांचा अर्ज आयडीसीने फेटाळला. शिवाय लोटली किंवा वेर्णा येथे सनबर्न आयोजित करण्याचा प्रस्ताव किंवा अर्ज आमच्याकडे आलेलाच नाही. त्यामुळे मी यासंदर्भात काहीच प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले. आमच्या परीने आम्ही यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पंचायतीचा स्वतंत्र प्रकल्प हवा

वेर्णा येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या कचरा प्रकल्पाला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वत:चा कचरा प्रकल्प उभारावा, अशी ग्रामस्थांची भावना आहे. पंचायतीने कचरा प्रकल्पाबद्दल गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाला याबाबत कळविले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रत्युत्तर आले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कचरा प्रकल्पाचा चेंडू सरकारच्या कोर्टात

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या मताप्रमाणे प्रत्येक औद्योगिक वसाहतीत एक कचरा प्रकल्प, असा नियम आहे. त्याप्रमाणे प्रस्तावित कचरा प्रकल्प वेर्णा येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लोकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. प्रकल्प हवा की नको हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असेही आमदार लॉरेन्स म्हणाले.

खाजन शेतीवर संकट अटळ

रामिरो मास्कारेन्हस यांनी बोरी पुलासंदर्भात सांगितले की, नवा बोरी पूल कुठेही बांधला तरी त्यावर जाण्यासाठी जो रस्ता तयार केला जाईल, त्यामुळे खाजन शेती नष्ट होणारच आहे. यापूर्वीही खाजन शेती नष्ट झाली होती, असे त्यांनी सांगितले.

सरकारने परवानगी देऊ नये!

तरुणाई ड्रग्सच्या आहारी जात असल्याने गोव्यात कुठेही हा महोत्सव आयोजित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केल्याचे मारियो परेरा यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी ‘सनबर्न’चे प्रतिनिधी पाहणीसाठी आले, तेव्हा त्यांना माघारी पाठविले होते, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 15 August 2025: कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य टिकवण्यावर भर द्या; महत्त्वाचे करार यशस्वी होतील

Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

SCROLL FOR NEXT