Loss of Electricity Department due to winds and rain Dainik Gomantak
गोवा

वादळी वाऱ्यामुळे एकट्या काणकोणमध्ये वीज खात्याचं 6 लाखांचं नुकसान

झाडे उन्मळून पडल्याने आठहून अधिक वीज खांब मोडले; अनेक ठिकाणी तारा तुटल्या

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज खात्याचं सुमारे 6 लाखांचं नुकसान झालं आहे. पाळोळे आणि अन्य भागात वीजेच्या तारांवर माडासह अन्य झाडे उन्मळून पडल्याने आठहून अधिक वीज खांब मोडून पडले आहेत तर अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु केले आहे. संध्याकाळपर्यंत पाळोळेतील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती वीज खात्याचे सहाय्यक अभियंता अनुप राणे यांनी दिली आहे.

पाळोळेसह आसपासच्या किनाऱ्याला वादळी वाऱ्याचा सोमवारी रात्री जोरदार फटका बसला. सोसाट्याचे वारे वाहत असल्याने किनाऱ्यालगत असलेल्या पर्यटकांच्या कॉटेज आणि बीच रिसॉर्टवरील प्लास्टिक खुर्च्या समुद्रात जाऊन पडल्या. तसेच ओव्हरे पाळोळे येथे एका घरावर माड पडून घराचं मोठं नुकसान झालं आहे. एकट्या पाळोळेमध्ये चार-पाच माडांची पडझड वीज तारांवर झाली त्यामुळे या भागातील वीजप्रवाह रात्रीपासून खंडित झाला आहे.

दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे मडगाव-कारवार हमरस्त्यावर करमल घाटात वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.काल रात्रीपासूनच अग्निशमन दलाचे कर्मचारी पडझड झालेले वृक्ष आणि माड हटविण्याच्या कामात व्यस्त आहेत.

दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अनेक विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह सोमवारी रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे गोव्याच्या अनेक भागात दाणादाण उडाली. साधारण पाऊण तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी झाले होते. वाऱ्यामुळे बहुतेक भागात वीज पुरवठाही खंडित झाल्याने रात्रीभर सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. सकाळनंतर काही भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वीज खात्याला यश आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य गोळीबारात ठार

IND vs AUS Semifinal: हरमनप्रीत कौरची चूक क्रांती गौडने सावरुन घेतली! एलिसा हिलीचा कॅप्टनने सोडलेला झेल, पण गोलंदाजाने केली कमाल VIDEO

दोना पावला दरोडा प्रकरणात 7 महिन्यानंतर अटक, उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार ताब्यात; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT