National Highways Dainik Gomantak
गोवा

'राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहिल्यावर विकास कसा असतो ते समजते' -राजन कोरगावर

विकास स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांना अपेक्षित आहे का असा सवाल मिशन फॉर लोकलचे (Mission for Local) राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना केला.

दैनिक गोमन्तक

पेडणे (Pernem) तालुक्यातील आणि पर्यायाने पेडणे मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गाचे (National Highways) सध्या जे निकृष्ट दर्जाचे ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्यावरून पेडणेचा आमदार किती जागृत आहे हे लक्षात येते ,विकासाच्या नावावर लुटालूट चालू आहे , भूमिपूजन करूनही कामाला गती दिली जात नाही, विकास म्हणजे कसा असतो तो राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहिल्यावर लक्षात येते , हाच विकास स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांना अपेक्षित आहे का असा सवाल मिशन फॉर लोकलचे (Mission for Local) राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना केला.

राष्ट्रीय महामार्गाचे अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम सुरु आहे. आज पर्यंत या रस्त्याविषयी नागरिकांनी आवाज उठवला , मात्र स्थानिक आमदाराने मौनव्रत धारण केले , जनतेचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक आपला लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या माध्यमातून निवडतात , त्या आमदाराने जनतेच्या समस्या सोडवणे हि अपेक्षा असते. मात्र त्या समस्या सोडवण्याऐवजी त्या गंभीर बनवल्या जातात असा दावा राजन कोरगावकर यांनी केला आहे.

रस्ता म्हणजे डोकेदुखी

रस्त्याचे सध्या जे निकृष्ट पद्धतीने काम चालू आहे ठीक ठिकाणी धोकादायक वळणे आणि कंत्राटदार आपल्या पद्धतीने काम करतो त्याला कधी आमदार जाब विचारत नाही , आमदार दरदिवशी मतदार संघात याच राष्ट्रीय महामार्गातून प्रवेश करतो , त्यावेळी त्याना रस्त्यावरील खड्डे दिसत नाही का , त्याना दिसत नसल्याने ते परत अधिकाऱ्यांना घेवून पाहणी करून धूळफेक करतात . असा आरोप कोरगावकर यांनी केला.

लोकांनी रस्ता कसा ओलांडावा ?

राष्ट्रीय महामार्गाच्या अलीकडे पलीकडे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी , बागायती आहे ,प्रत्येकवेळी नागरिकाना राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून जनावरे , नांगरणीसाठी लागणारे बैल किंवा आधुनीक पावर टिलर न्यावे लागतात ते कसे नेणार असा सवाल करून ठिकठीकाणी भुयारी मार्ग यांचे नियोजन करण्यात आले नाही त्याबद्दल राजन कोरगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भुयारी मार्ग नसल्याने हे शेतकरी नागरिक सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनाबरोबर रस्ता कसा क्रॉस करणार असा सवाल केला आहे , ज्या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता आहे त् या ठिकाणी उभारण्यासाठी आमदार बाबू आजगावकर मंत्री असूनही आजपर्यंत प्रयत्न का केले नाहीत .असा प्रश्न उभा केला.

आमदार मंत्र्याने आता कृती करावी

ज्या नेत्याला मतदार निवडून देतात तो लोकप्रतिनिधी मग जनतेचा सेवक आणि नोकरच असतो . एकदा का आमदार निवडून आला कि जनतेची सेवा त्यांची नोकरी करतो कि केवळ भाषणातून बोलतो , आता प्रत्यक्ष निदान निवडणुकीसाठी सहा महिन्याचा काळ आहे आता तरी मतदारांचा सेवक आणि नोकर आमदाराने कृतीतून बनण्याचे आवाहन कोरगावकर यांनी केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT