Crime News Dainik Gomantak
गोवा

Tanvi Vasta Case: 'तन्‍वी'च्‍या खात्यात फक्त 8500 रुपये! पोलिसांसमोर पैसे शोधण्याचे आव्‍हान; फसवणूक झालेल्यांच्या सेंट्रल बँकेसमोर रांगा

Goa Bank Fraud: तक्रारी पाहता तन्वी व जाधव यांनी ज्‍येष्ठ नागरिक तसेच मोबाईलचे ज्ञान नसलेल्या लोकांना आपले लक्ष्‍य केल्याचे दिसून येते. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १८ लाख रुपयांचे दागिने जप्त केले असले तरी तन्‍वीच्‍या बँक खात्यात फक्त ८५०० रुपये असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Queue At Curchorem Central Bank After Fruad By Tanvi Vasta Anand Jadhav

केपे: कुडचडे येथील सेंट्रल बँकेचा आनंद जाधव व सेनी कुलासो ऊर्फ तन्वी वस्त या दोघांनी मिळून वीस ते बावीस खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्‍यामुळे हे खातेधारक प्रचंड तणावाखाली आहेत. दिवसाला कित्येकजण आपले खाते तपासण्यासाठी बँकेत येत असल्याने लोकांच्या रांगा लागत आहेत. आतापर्यंत कुडचडे पोलिसांत दोन्‍ही संशयितांविरोधात २४ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

ज्या तक्रारी आल्या आहे ते पाहता तन्वी व जाधव यांनी ज्‍येष्ठ नागरिक तसेच मोबाईलचे ज्ञान नसलेल्या लोकांना आपले लक्ष्‍य केल्याचे दिसून येते. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १८ लाख रुपयांचे दागिने जप्त केले असले तरी तन्‍वीच्‍या बँक खात्यात फक्त ८५०० रुपये असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे लोकांची लुबाडणूक करून मिळविलेले पैसे तिने कुठे ठेवले आहेत, याचा तपास करण्याचे मोठे आव्‍हान पोलिसांसमोर आहे.

काकोडा येथील स्टीव्हन्‍सन फर्नांडिस या ज्‍येष्‍ठाने आपल्याला ८ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार दाखल केली आहे. फर्नांडिस यांनी आपल्या एका फ्लॅटची विक्री केली होती व सदर पैसे सेंट्रल बँकेत ठेवले होते.

काही दिवसांनी फर्नांडिस बॅंकेत गेले असता तन्‍वी या बँक कर्मचारी असल्याचे समजून त्‍यांना कायम ठेवीविषयी विचारले. तिने दीड लाखाच्या दोन व दोन लाखांची एक मिळून पाच लाखांच्या ‘फडी’चे बनावट सर्टिफिकेट दिले. तसेच आपल्या नकळत आपल्या खात्यातील तीन लाख रुपये काढले असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT