Goa Beach 
गोवा

Fake Kidnapping in Goa: लंडन लेडीचा हैद्राबादच्या कॅब ड्रायव्हरवर जडला जीव; Goa Vacation साठी नवरा - पोरंबाळं सोडली, अपहरणाचा केला बनाव

Hyderabad cab driver and London woman's affair: पती हैद्राबादला असताना महिला मुलांसोबत लंडनमध्ये एका गार्डनमध्ये गेली होती. दरम्यान, दोन्ही मुलांना गार्डनमध्येच सोडून महिलेने तेथून पळ केला.

Pramod Yadav

पणजी: लंडनच्या ३५ वर्षीय महिलेचा हैद्राबाद येथील कॅब ड्रायव्हरवर जीव जडला. या ड्रायव्हरसोबत गोव्यात व्हेकेशनवर जाण्यासाठी या विवाहित महिलेने आपल्या मुलांना लंडनच्या पार्कमध्ये सोडून पळ काढला. पतीने पोलिसांत धाव घेत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तर, महिलेने प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी अपहरणाचा बनाव केला.

कॅब ड्रायव्हर आणि कथित बेपत्ता झालेली महिला दोघेही गोव्यातून परत येताना सायबराबाद पोलिसांना आढळून आले.

झाले असे की बेपत्ता झालेली महिला काही दिवसांपूर्वी पती आणि मुलांसोबत भारतात होती. महिलेचा पती सॉफ्टवेअर अभियंता असून, लंडनमध्ये कार्यरत आहे. पती माघारी गेल्यानंतर देखील महिला हैद्राबादमध्येच होती या काळात, महिला एका कॅब ड्रायव्हरच्या संपर्कात आली. दोघांमध्ये जवळीकता वाढली, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

महिला माघारी लंडनला गेल्यानंतर देखील दोघांमधील संपर्क कायम होता. महिलेच्या सासूचे निधन झाल्याने तिचा पती हैद्राबादला आला होता. यावेळी महिला मुलांसह लंडनमध्येच होती.

पती हैद्राबादला असताना महिला मुलांसोबत लंडनमध्ये एका गार्डनमध्ये गेली होती. दरम्यान, दोन्ही मुलांना गार्डनमध्येच सोडून महिलेने तेथून पळ केला. मुलांनी आई बेपत्ता झाल्याची माहिती हैद्राबाद येथे असणाऱ्या वडिलांना दिली. महिलेच्या पतीने संबधित घटनेची तक्रार हैदराबाद येथील सायबराबाद पोलिस ठाणे आणि विमानतळ पोलिसांना दिली.

सायबराबाद पोलिसांनी तक्रारीनुसार घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना दोघेही गोव्यातून परत येताना आढळून आले. अपहरण झाले नाही तर मी मर्जीने त्याच्यासोबत गेल्याची कबुली महिलेने पोलिसांना दिली.

व्हिडिओ पाठवून पतीला दिली अपहरण झाल्याची माहिती

महिलेने एक व्हिडिओ पाठवून तिचे अपहरण झाल्याची माहिती दिली. कॅब ड्रायव्हरने अपहरण केले असून तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती महिलेने व्हिडिओतून दिली. व्हिडिओ पाहून पतीने ई-मेलद्वारे सायबराबाद पोलिसांत तक्रार दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT