Goa Eco Sensitive Area Dainik Gomantak
गोवा

Goa Eco Sesitive Zone: ‘लोलये’ जैवसंवेदनशील क्षेत्रात ठेवा! ग्रामस्थांची एकमताने मागणी

Loliem: लोलयेच्या ग्रामसभेत लोलये गाव पश्चिम घाट जैव संवेदनशील क्षेत्रात कायम ठेवण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. तसेच गावातील पठारांवर विकासकामे करणे व भूरूपांतरणास आळा घालण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Lolaye Village Goa Eco Sesitive Zone

काणकोण: लोलयेच्या ग्रामसभेत लोलये गाव पश्चिम घाट जैव संवेदनशील क्षेत्रात कायम ठेवण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. तसेच गावातील पठारांवर विकासकामे करणे व भूरूपांतरणास आळा घालण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. या सभेला शंभरपेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते.

या सभेत हल्लीच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यापूर्वी लोलये गाव जैव संवेदनशील यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी करणारे ३११ ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन देण्यात आले आहे.

जैव संवेदनशील मसुद्यात जमिनीची मालकी बदलणे, घरांची बांधणी व दुरुस्ती करण्यास प्रचलित कायद्याप्रमाणे मुभा आहे. त्याचप्रमाणे शेती, बागायती, लागवड, वनीकरण व आर्थिक व्यवसाय करण्यास पूर्ण मुभा आहे, असे लोलये नागरिक समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद प्रभुगावकर यांनी ग्रामसभेत सांगितले.

जैवसंवेदनशील गावाचा दर्जा मिळाल्यानंतर गावात प्रदूषणकारी मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना आळा बसेल. त्यांना परवानगी देण्यासाठी ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे प्रशांत पागी यांनी सांगितले.

जैव संवेदनशील गाव म्हणून घोषित केल्यामुळेच ग्रामस्थांचाच फायदा होणार आहे. या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे प्रभुगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT