Loksabha Election  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : बलशाली भारतासाठी मोदी सरकार गरजेचे : श्रीपाद नाईक

Loksabha Election : लाडफे येथे काल झालेल्‍या कोपरा बैठकीत मार्गदर्शन करताना नाईक बोलत होते. खासदारकीच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा त्‍यांनी यावेळी आढावा घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

डिचोली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. भारताला जगात महाशक्ती बनविणे हे त्यांचे स्वप्न आहे.

या स्वप्नपूर्तीसाठी केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी केले. ‘अब की बार, ४०० पार’ या लक्ष्यपूर्तीसाठी गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचारकार्यात झोकून द्यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

लाडफे येथे काल झालेल्‍या कोपरा बैठकीत मार्गदर्शन करताना नाईक बोलत होते. खासदारकीच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा त्‍यांनी यावेळी आढावा घेतला. कार्यकर्त्यांची तळमळ आणि त्‍यांच्‍याकडून मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळी मतांच्या आघाडीत वाढ होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्‍यान, या कोपरा बैठकीपूर्वी आमदार डॉ. शेट्ये यांच्यासह श्रीपाद नाईक यांनी श्री सातेरी केळबाय देवीचा आशीर्वाद घेतले. देवस्थान समितीचे अध्यक्ष विष्णू मळीक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी श्रीपाद नाईक यांचे स्वागत केले.

यावेळी माजी सभापती राजेश पाटणेकर, भाजपचे प्रभारी प्रा. संतोष मळीक, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, डॉ. शेखर साळकर, लाटंबार्से सरपंच पद्माकर मळीक, राजेश्वरी मळीक, आजी-माजी पंचसदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी, श्रीपाद नाईक यांनी लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील उसप, वडावल, नानोडे, कासारपाल, खरपाल आदी भागातील देवतांचे आशीर्वाद घेतले.

डिचोलीत मोठ्या आघाडीचा निर्धार

डिचोलीत भाजपसाठी अनुकूल वातावरण असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता यावेळी डिचोलीत भाजप उमेदवाराला मोठी आघाडी मिळून एक विक्रम प्रस्थापित होणार असल्याचा विश्‍‍वास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut in Goa: गोमंतकीयांना कर्नाटक, केरळमधून आयात केलेल्या नारळावर अवलंबून राहावे लागावे हे दुर्दैव..

Goa Opinion: कामतांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मनोहर पर्रीकरांना हे रुचले असते का?

Human Trafficking: फोंड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, पीडित तरुणीची सुटका; पश्चिम बंगाल, यूपीतील 3 जणांना अटक

Patri Ganpati Goa: दक्ष राजाच्या यज्ञावेळी अपमानीत झालेल्या देवी 'पार्वती'ने यज्ञकुंडात उडी घेतली; गोव्यातील पत्री पूजनाची परंपरा

गुळातही सापडली भेसळ! राज्यात प्रोटीनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना FDAचा दणका

SCROLL FOR NEXT