Goa Apple Trees
Goa Apple TreesDainik Gomantak

Goa Apple Trees : गोव्यातही बहरणार सफरचंदाची झाडे; पहिल्या प्रयोगाला यश

Goa Apple Trees : विशेष म्हणजे, त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. यातील काही झाडांना सफरचंदाची फळे लागली आहेत, असे त्यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीला सांगितले.

Goa Apple Trees :

सासष्टी, भारतात सफरचंदाचे उत्पादन हिमाचल प्रदेश, काश्मीर, सिमला यासारख्या थंड हवामानाच्या प्रदेशांत होते.

पण राय येथील एक प्रगतशील शेतकरी एडवर्ड मेंडिस यांनी प्रयोग म्हणून आपल्या घरासभोवतालच्या बागायतीत तसेच चिंचोणे येथील फार्म हाऊसमध्ये सफरचंदाच्या झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे, त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. यातील काही झाडांना सफरचंदाची फळे लागली आहेत, असे त्यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीला सांगितले.

Goa Apple Trees
Goa Accident: गिरीत उड्डाण पुलावरून खाली कोसळला मालवाहू ट्रक; एक कामगार ठार, दोन जखमी Watch

मेंडिस म्हणाले की, मी दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील विलासपूर येथून तीन प्रकारच्या सफरचंदांची २०० कलमे आणली. आता या कलमांचे रोपट्यांमध्ये रूपांतर झाले असून काही रोपट्यांना फळे लागली आहेत.

एका रोपट्याला तर लाल रंगाचे सफरचंद लागले आहे. गोव्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे मेंडिस यांचे म्हणणे आहे. सफरचंद लागलेली रोपटी मुद्दाम बाजूला ठेवली आहेत; कारण लोक येऊन त्यांना हात लावतात, असे मेंडिस यांनी सांगितले.

१६५ दिवसांत होते फळधारणा

सफरचंद रोपट्याला फळधारणा व्हायला १६५ दिवस लागतात, असे मेंडिस यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडील इतर रोपट्यांना लागलेली सफरचंदाची फळे मे महिन्याच्या शेवटास किंवा जूनच्या मध्यास पिकून तयार होतील, असे त्यांनी सांगितले. बंगळुरू, केरळ आणि बेळगावमध्ये सुद्धा असे प्रयोग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

न्यूझीलंडमधील प्रजातीवरही प्रयोग

मेंडिस म्हणाले की, न्यूझीलंडहून सुद्धा मी एक कलम आणले आहे. मात्र, त्याची लागवडीची प्रक्रिया बरीच किचकट आहे. न्यूझीलंडच्या सफरचंदाचे बी प्रथम रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागते. मग त्याचे रोपटे तयार करावे लागते. सध्या एक रोपटे तयार झाले आहे; पण त्याला थोडा अवधी लागेल, असे ते म्हणाले.

Goa Apple Trees
Goa Accident: गिरीत उड्डाण पुलावरून खाली कोसळला मालवाहू ट्रक; एक कामगार ठार, दोन जखमी Watch

सफरचंद लागवडीचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. रोपट्याला पहिले सफरचंद लागल्याचे पाहून मला अत्यंत आनंद झाला. माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. गोव्यात सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याची माझी इच्छा आहे.

- एडवर्ड मेंडिस, प्रगतशील शेतकरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com