Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election Goa : काँग्रेसला ‘लीड’ देण्याचे युरींपुढे आव्हान

Loksabha Election Goa : कुंकळ्ळीत भाजपला हिंदू आधार : ख्रिस्तीबहुल भागात लागेल कस

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election Goa :

कुंकळ्‍ळीचे आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्यापुढे आपला मतदार राखण्याचे मोठे आव्हान असून आमदार युरी सेना कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांच्‍यासाठी नसले तरी आपल्या आमदारासाठी काँग्रेसच्या पारड्यात मते मिळविण्यासाठी श्रम करणार का?

ज्याच्या खांद्यावर काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे, ते युरी घरच्या कुंकळ्‍ळी मतदारसंघात विरियातो यांना लीड मिळवून देण्यात यशस्वी होणार का? भाजपच्या पल्लवी धेंपेंसाठी स्थानिक भाजप कार्यकर्ते मनातून काम करणार का? या प्रश्‍नांच्या उत्तरावर कुंकळ्‍ळीतील यशापयश ठरणार आहे.

कुंकळ्‍ळी मतदारसंघातील तीस हजार मतदार लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवारास जवळ करतात, ते पाहावे लागणार. तसे पाहिले तर कुंकळ्‍ळीकरांसाठी भाजपच्या पल्लवी, काँग्रेसचे विरियातो व ‘आरजी’चे रुबर्ट परेरा हे तिघेही नवखेच. आता पक्ष संघटना व नेते काय ठरवतात, त्यावर कार्यकर्ते व मतदार काय निर्णय घेतात यावरून कोणत्या उमेदवाराला जनता स्‍वीकारणार हे स्पष्ट होणार आहे.

कुंकळ्‍ळीत काँग्रेसचा आमदार व तोही विरोधी पक्ष नेते असल्यामुळे काँग्रेस उमेदवार विरियातो यांना थोडे ‘ॲडव्हांटेज’ असणार यात शंका नाही. मात्र, भाजपने महिला उमेदवार दिल्याने महिला मतदारांची प्रथम पसंती पल्लवी ठरू शकते. कुंकळ्ळीत महिला मतदारांची संख्या जास्‍त आहे, ही भाजपला जमेची बाजू ठरू शकते. मात्र भाजप कार्यकर्ते तेवढ्या जोमाने काम करताना दिसत नाहीत,याचा फटका बसू शकतो.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भावोजी विदेश देसाई हे कुंकळ्ळीत एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवकही आहेत. त्यांच्याकडे पल्लवींना लीड देण्याचे सामर्थ्य नाही का,असा प्रश्न पडतो.भाजपचे महिला मंडळ जोमात आले तरी, भाजपचा मफलर घालून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांत मात्र पूर्वीसारखी ऊर्जा दिसत नाही, हेही तेवढेच खरे.

आमदार युरी आलेमाव गट व काँग्रेस नेते एल्विस गोम्स गट एकाच पक्षात असून दोघांची तोंडे दोनकडे. मात्र काही युरी समर्थक नगरसेवकांत व युरीच्या कार्यकर्त्यांत पटत नाही. त्याचा फटका बसू शकतो.कुंकळ्‍ळी पालिकेवर युरींची सत्ता आहे. बाळ्‍ळी, गिरदोली, चांदर, माकाझान व पारोडा पंचायत मंडळ काँग्रेसकडे आहे, याचा लाभ घेण्यात काँग्रेस यशस्वी होते का, ते पहावे लागेल.

बहुतांश हिंदू मतदार भाजपच्‍या बाजूने राहण्याची शक्यता आहे. धेंपे नावामुळे ख्रिश्‍चन बहुल क्षेत्रात भाजपाला फायदा होऊ शकतो. काँग्रेसचे उमेदवार विरियातो यांनी काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले होते. परिणामी शिवप्रेमी अन् मराठ्यांचा राग त्यांना बाधू शकतो.

‘आरजी’चेे रुबर्ट परेरा यांचा मोठा प्रभाव नसला तरी आरजी काँग्रेसची हजारांवर मते आपल्या बाजूने वळविणार हे निश्चित.घोडा मैदान जवळ आहे. बघू नारी शक्ती यशस्वी ठरते, की कॅप्टनला स्वाभिमानी जनता स्वीकारते हे पहावे लागेल.

संपूर्ण देशात भाजपचे वारे असून यात काँग्रेसचे गोव्यातील दोन्ही उमेदवार वाहून जाणार हे निश्चित. कुंकळ्‍ळीची जनता नारी शक्ती पल्लवी धेंपे यांच्या बाजूने राहणार असून यावेळी कुंकळ्‍ळीत भाजपला लीड मिळेल,असा विश्वास आम्हाला आहे. भाजपाने जो विकास साधला आहे, जनतेत व देशात जो स्वाभिमान भरला आहे, त्याचे फळ पक्षाला मिळणार,असे वाटते.

- विशाल देसाई, नगरसेवक भाजप समर्थक

काँग्रेस पक्ष दक्षिण गोवा लोकसभा जागा सहज राखणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही निवडणूक जिंकली हे निश्चित. आता लीड किती ते बाकी आहे.आमचे आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस दोन्ही जागा जिंकणार.

कुंकळ्‍ळी मतदारसंघात आम्ही मोठ्या मताच्‍या फरकाने आघाडी घेणार. भाजपने कितीही हातपाय मारले तरी दक्षिण गोवा त्यांच्यापासून दूरच राहणार.

- संकेत कुंदे, काँग्रेस कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT