Sattari  Dainik Gomantak
गोवा

Sattari News : राणेंमुळेच सत्तरीत मताधिक्य : श्रीपाद नाईक

Sattari News : सत्तरीतून विश्वजित राणे यांच्यामुळेच आपल्याला मोठे मताधिक्य मिळणार, असा विश्वास भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. ते म्हाऊस पंचायत मधील चव्हाटेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News :

वाळपई, जेव्हापासून विश्वजित राणे यांनी भाजपची सूत्रे सांभाळली. तेव्हापासून सत्तरीची प्रगती झाली. या भागात लोकोपयोगी प्रकल्प साकारल्या जात आहेत.

सत्तरीतून विश्वजित राणे यांच्यामुळेच  आपल्याला मोठे मताधिक्य मिळणार, असा विश्वास भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. ते म्हाऊस पंचायत मधील चव्हाटेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

 यावेळी  आरोग्यमंत्री  विश्वजीत  राणे, पर्ये आमदार डाॅ. दिव्या राणे, विनोद शिंदे,  केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सरपंच सोमनाथ काळे, उपसरपंच राधिकी सावंत, सयाजी सावंत, कांता गावस, गुरुदास गावस, प्रिती गावकर, देवस्थान पुजारी अनंत गावकर, धर्मा गावस आदींची उपस्थिती होती. 

श्रीपाद नाईक म्हणाले, केंद्र सरकारतर्फे आतापर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून  सरकारच्या सर्व सुविधा गरजूंपर्यंत पोहचविल्या जात आहेत. कृषी कल्याण, महिला कल्याण, गरीब कल्याण अशा कल्याणकारी योजनांमुळे लोकांना लाभ मिळाला मिळाला आहे.

विश्वजित राणे म्हणाले, आम्ही समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. वाळपईबरोबर पर्ये मतदार संघात श्रीपाद नाईक यांना मोठ्या प्रामाणात मतदान केले जाणार असून हा आकडा ३० हजारांच्या पुढे जाणार आहे.

आमदार डाॅ. दिव्या राणे म्हणाल्या, की दोन महिन्यांपासून आम्ही लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना सत्तरीच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचे म्हणणे, त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या असून सत्तरीच्या विकासासाठी जे जे काही करता येणार आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकास हेच ध्येय असून त्यात जात धर्म हा भेदभाव आम्ही करत नाही.

केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे सत्तरीत आज मोठे प्रकल्प साकारल्या जात आहेत, असे त्या म्हणाल्या. स्वागत सरपंच सोमनाथ काळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार उदय सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT