Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Supreme Court Verdict on Bastard Word: जमिनीच्या सीमा निश्चित करण्यावरुन झालेल्या वादात आरोपींनी 'बास्टर्ड' या शब्दाचा वापर केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवले होते.
Supreme Court Verdict on Bastard Word
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court Verdict on Bastard Word: रागाच्या भरात किंवा वादावादी दरम्यान 'बास्टर्ड' सारख्या अपशब्दांचा किंवा शिवीगाळ करणाऱ्या शब्दांचा वापर करणे म्हणजे भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 294(ब) अंतर्गत 'अश्लीलता' ठरु शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालामुळे मालमत्तेच्या वादातून शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांची या प्रकरणातील दोषसिद्धी रद्द केली.

हे संपूर्ण प्रकरण एका कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून उद्भवले होते. जमिनीच्या सीमा निश्चित करण्यावरुन झालेल्या वादात आरोपींनी 'बास्टर्ड' या शब्दाचा वापर केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

Supreme Court Verdict on Bastard Word
High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले की, कलम 294 (ब) अंतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्या शब्दांमध्ये कोणताही 'लैंगिक घटक' (Sexual element) असणे अनिवार्य आहे. केवळ एखाद्याला शिवी देणे किंवा अपशब्द वापरणे म्हणजे अश्लीलता नव्हे. खंडपीठाने म्हटले की, "आमच्या मते, केवळ 'बास्टर्ड' शब्दाचा वापर करणे हे एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक भावना किंवा कामुक इच्छा जागृत करण्यासाठी पुरेसे नाही. विशेषतः आजच्या काळात वादादरम्यान अशा शब्दांचा वापर सामान्य झाला आहे. त्यामुळे या शब्दाला अश्लील मानून शिक्षा देणे कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही."

Supreme Court Verdict on Bastard Word
High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

या निकालात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 'अपूर्वा अरोरा विरुद्ध दिल्ली सरकार' या जुन्या खटल्याचा संदर्भ दिला. न्यायालयाने नमूद केले की, आयपीसीमध्ये 'अश्लील' शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या दिलेली नाही. मात्र, अश्लीलता ही प्रामुख्याने लैंगिक उत्तेजना किंवा कामुकतेशी संबंधित असते. मालमत्तेच्या वादात दिलेल्या शिवीगाळीचा असा कोणताही परिणाम होत नाही, हे न्यायालयाने अधोरेखित केले.

Supreme Court Verdict on Bastard Word
High Court: ‘कथित धर्मांतरणा’चा गुन्हा रद्द, पास्टर डोमिनिक आणि पत्नी जोनला हायकोर्टाचा मोठा दिलासा, याचिका काढली निकाली!

सरकारी वकीलांनी असा युक्तिवाद केला की, हा शब्द मृतासाठी वापरला गेल्याने तो गंभीर आहे, परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केले की, शिवीगाळ करणे चुकीचे असू शकते, परंतु ते 'अश्लील कृत्यांच्या' व्याख्येत बसत नाही. या निकालामुळे आता वादावादीत वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या कायदेशीर अर्थाबाबत एक नवीन दिशा मिळाली असून निव्वळ शिवीगाळ केल्याने अश्लीलतेचा गुन्हा दाखल करता येणार नाही, हे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com