भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Kalpakkam Prototype Fast Breeder Reactor Critical: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल देशवासियांचे अभिनंदन करताना याला भारतीय अणुऊर्जा प्रवासातील एक 'मैलाचा दगड' आणि 'निर्णायक पाऊल' असे संबोधले.
Kalpakkam Prototype Fast Breeder Reactor Critical
Kalpakkam Prototype Fast Breeder Reactor CriticalDainik Gomantak
Published on
Updated on

Kalpakkam Prototype Fast Breeder Reactor Critical: भारताने अणुऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून तामिळनाडूतील कल्पक्कम येथील 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर' आता प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा 'क्रिटिकल' टप्प्यावर पोहोचले आहे. या यशासह भारत आता जगातील अशा निवडक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, ज्यांच्याकडे ही प्रगत अणू तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरला असून यामुळे भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल पडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल देशवासियांचे अभिनंदन करताना याला भारतीय अणुऊर्जा प्रवासातील एक 'मैलाचा दगड' आणि 'निर्णायक पाऊल' असे संबोधले. तामिळनाडूच्या कल्पक्कम येथे उभारण्यात आलेले हे 500 मेगावॅट क्षमतेचे रिएक्टर पूर्णपणे भारतीय बनावटीचे (स्वदेशी) असून त्याची रचना आणि विकास भारतीय अणू कंपनी 'भाविनी'ने (भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड) केला. अणुभट्टी 'क्रिटिकल' होणे म्हणजे त्यामध्ये अणू विखंडनाची प्रक्रिया (Nuclear Fission) शाश्वत आणि नियंत्रित पद्धतीने सुरु होणे, जो वीज निर्मितीपूर्वीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

Kalpakkam Prototype Fast Breeder Reactor Critical
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

'फास्ट ब्रीडर रिएक्टर' (FBR) हे तंत्रज्ञान अत्यंत खास आहे, कारण हे रिएक्टर जेवढे अणू इंधन वापरतात, त्यापेक्षा जास्त नवीन इंधन ते तयार करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे रिएक्टर वीज निर्मितीसोबतच भविष्यासाठी इंधन निर्मितीचा कारखाना म्हणूनही काम करतात. भारताच्या त्रि-स्तरीय अणू ऊर्जा कार्यक्रमाचा हा दुसरा टप्पा आहे. या तंत्रज्ञानामुळे भारताला आपल्याकडे असलेल्या थोरियमच्या अफाट साठ्याचा वापर करुन भविष्यात ऊर्जा निर्मिती करणे शक्य होणार आहे. हे रिएक्टर प्लुटोनियमवर आधारित इंधनाचा वापर करते आणि पुढे थोरियमपासून युरेनियम-233 तयार करण्यास मदत करते.

Kalpakkam Prototype Fast Breeder Reactor Critical
Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

तज्ज्ञांच्या मते, कल्पक्कममधील या प्रयोगाच्या यशामुळे भारताचे आयात इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा निर्मितीला वेग येईल. तसेच, हे तंत्रज्ञान पर्यावरपूरक आहे, कारण यामध्ये अणू कचरा अत्यंत कमी प्रमाणात तयार होतो आणि ऊर्जा निर्मितीची क्षमता अधिक असते. रशिया सध्या या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करत असून, भारताने या क्षेत्रात मिळवलेली ही आघाडी जागतिक अणू राजकारणात भारताचे वजन वाढवणारी ठरणार आहे. आगामी काळात हा रिएक्टर पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरु करेल, ज्यामुळे दक्षिण भारताच्या ग्रीडला मोठा आधार मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com