Shiroda Constituency  Dainik Gomatnak
गोवा

Shiroda Constituency : शिरोडा मतदारसंघात भाजपच्या प्रचारफेरीला प्रतिसाद

Shiroda Constituency : यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीत ‘अबकी बार ४०० पार’, ‘फिर मोदी सरकार’, ‘मोदी सरकारचा विजय असो’, ‘येऊन येऊन येणार कोण, पल्लवी धेंपेंशिवाय दुसरा कोण’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda Constituency :

शिरोडा, शिरोडा मतदारसंघात आज भाजपची प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी समस्त मतदारांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना मते देऊन विजयी करावे, असे आवाहन शिरोड्याच्या सरपंच मुग्धा शिरोडकर यांनी केले.

शिरोडा भाजप मंडळातर्फे शिरोडा गावात आज प्रचंड मोठी प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी मुग्‍धा शिरोडकर बोलत होत्या. या प्रचार फेरीत जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, पंच सदस्य शिवानंद नाईक, सुवास नाईक, राखी नाईक, आदींबरोबर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोडा गावात सर्वत्र फिरून पल्लवी धेंपे यांना मते देण्याचे आवाहन केले गेले.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीत ‘अबकी बार ४०० पार’, ‘फिर मोदी सरकार’, ‘मोदी सरकारचा विजय असो’, ‘येऊन येऊन येणार कोण, पल्लवी धेंपेंशिवाय दुसरा कोण’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT