Pallavi Dhempe
Pallavi Dhempe Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : सावर्डेत मतांची आघाडी देण्याची जबाबदारी आमची : आमदार गणेश गावकर

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

सावर्डे, भारतीय जनता पक्ष कोणताच भेदभाव न करता विकास करणारा पक्ष आहे. दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आमचे कर्तव्य आहे.

धेंपो परिवाराने उद्योगाच्या माध्यमातून सावर्डेवासीयांना रोजगार संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेतच, परंतु आता धेंपे निवडून आल्यानंतर सरकारी पातळीवरूनही सावर्डेवासीयांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू होतील.

सावर्डे मतदारसंघातून त्यांना भरघोस मताधिक्य मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे. धेंपे निवडून आल्यानंतर आम्ही आमची कामे घेऊन त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकणार, असे सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी आज नमूद केले.

भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार धेंपे यांनी गुरुवारी सावर्डे मतदारसंघात प्रचार दौरा केला.

यावेळी आमदार गावकर तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर, भाजपाचे गट अध्यक्ष विलास देसाई, सरचिटणीस शिरीष देसाई, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, सुधा गावकर, कुळेच्या उपसरपंच नेहा मडकईकर, पंच सोनम डोईफोडे, अश्विनी नाईक देसाई, अनिकेत देसाई, साईश नाईक, प्रसाद गावकर, अजय बांदेकर, बेनी आझावेदो, नारायण कोलवेकर, भाजप कार्यकर्ते व हितचिंतक यांची उपस्थिती होती.

धेंपे यांनी दूधसागरजवळ टूर एसोसिएशनच्या कार्यालयात बैठक घेतली. यानंतर त्यांनी कलनाथ देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतले.

कलनाथ मंदिराला भेटीनंतर करमणे दाभाळ किर्लपाल येथील प्राथमिक शाळजवळ तसेच टोनीनगर-सावर्डे येथील बालवाडीजवळ त्यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सावर्डेवासीयांच्या समस्या जाणून घेतल्या व निवडून आल्यानंतर त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांशी भावनिक नाते !

सावर्डेवासीयांशी आपले भावनिक नाते असल्याचे भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी यावेळी सांगितले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT