Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Loksabha Election 2024 : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सावर्डेतून भाजपला आघाडी मिळाली आहे, यंदासुद्धा ही आघाडी निश्चित आहे, असा विश्‍‍वासही मंडळाने व्‍यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

फोंडा, दक्षिण गोव्‍यातील भाजपच्‍या उमेदवार पल्लवी धेपे यांना सावर्डे विधानसभा मतदारसंघातून २० हजारांचे मताधिक्‍य मिळवून देण्‍याची ग्वाही भाजप गटमंडळ समितीने दिली आहे.

प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सावर्डेतून भाजपला आघाडी मिळाली आहे, यंदासुद्धा ही आघाडी निश्चित आहे, असा विश्‍‍वासही मंडळाने व्‍यक्त केला आहे.

भाजप सरकारच्या कार्यकाळात सावर्डे मतदारसंघात आमदारांच्या सहकार्याने विकासकामे पुष्कळ झाली आहेत आणि अनेक प्रकल्प मार्गी लागण्याच्या तयारीत आहे. आमदार डॉ. गणेश गांवकर यांच्या मार्गदर्शनखाली सावर्डेतील सातही पंचायत क्षेत्रांत प्रचार जोमाने सुरू आहे. त्यात भर म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सावर्डेतील पन्नाप्रमुख, बूथप्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचारसंबधी मार्गदर्शन केले.

सावर्डे मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्‍येने आहेत. त्‍यामुळे भाजपला चांगले मताधिक्‍य मिळेल हे निश्‍चित आहे. मतदारसंघात सुमारे ३० हजारांवर मतदार आहेत. साहजिकच भाजपला लोकसभा निवडणुकीत २० हजारांवर मताधिक्‍य मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे.

- डॉ. गणेश गावकर, आमदार (सावर्डे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT