Raj Thackeray On Goa-Mumbai expressway Dainik Gomantak
गोवा

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडत आहे

Manish Jadhav

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. त्याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. आपल्या भाषणादरम्यान राज यांनी पंतप्रधान मोदींकडे सहा मागण्या केल्या. यामध्ये त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर प्रकाश टाकला. दरम्यान, राज यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत ‘आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकले’, असेही म्हटले.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मनसेने अनेक आंदोलने केली. या मुद्द्यावरुन राज ठाकरे सातत्याने सरकारला धारेवर धरले. गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग बनवण्याचे काम सुरु आहे, मात्र तो अद्याप तयार झालेला नाही. त्याचे काम अपूर्णच आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2007 नंतर एवढी सरकारे आली पण महामार्गाचे काम होऊ शकले नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली होती. रस्त्यांच्या दुरावस्थेवर ते म्हणाले होते की, केवळ कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्याबाबत राज ठाकरे यांनी येथे सुरु असलेले जमिनीचे व्यवहार हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले होते. कोकणी लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जातील. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एकदा रस्ता झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात हे समजून घ्या, असेही राज यांनी यापूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

SCROLL FOR NEXT