Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Mumbai Goa Highway: चिपळूणचा उड्डाणपूल वगळता मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जूनअखेरीस पूर्ण होईल.
Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway:
Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway:Dainik Gomantak

Mumbai Goa Highway

गेल्या 12 ते 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न समस्त कोकणवासियांना पडला आहे. महामार्गाची चाळण झाली असताना अशा धोकादायक मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.

महामार्गाच्या पूर्णत्वाकडे डोळे लावून बसलेल्या कोकणवासियांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंदाची बातमी दिली आहे. महामार्ग कधी पूर्ण होणार याची माहिती गडकरींनी उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत दिलीय.

रखडलेला मुबंई-गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागेसाठी विशेष वकील उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. निकम यांच्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते.

चिपळूणचा उड्डाणपूल वगळता मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जूनअखेरीस पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी या सभेत दिली. महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते गोवा प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण होईल, असेही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway:
IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

नितीन गडकरी यांनी यावेळी बीपीटीच्या रोरो सेवेची देखील माहिती दिली. नागरिकांना रोरोद्वारे अलिबागला वाहने घेऊन जाता येतील आणि तेथून मुंबई-गोवा महामार्गाला जाता येईल, असे गडकरी म्हणाले. या सेवेमुळे मुंबई ते अलिबाग प्रवास 45 मिनिटांत पूर्ण करता येईल.

मुंबई-गोवा महामार्गाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. महामार्गाची झालेली दुर्दशा, खड्डे यामुळे होणार अपघात याबाबत सातत्याने सामान्य नागरिकांकडून जाब विचारले जातात. दरम्यान, जूनअखेर पर्यंत महामार्ग पूर्ण झाल्यास कोकणवासियांना मोठा दिलासा मिळेल एवढं नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com