Loksabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : एनडीए देशात साधणार हॅट्‌ट्रिक : आशिष सूद

Loksabha Election 2024 : यावेळी आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक अमय चोपडेकर, राज्य भाजप सदस्य जयंत जाधव, वास्को भाजप प्रभारी अनिथा थोरात, पूजा नाईक, अंकिता सातार्डेकर, संदीप नार्वेकर, प्रशांत नार्वेकर व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

वास्को, भाजपतर्फे लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचार वाहनांचे उद्‍घाटन भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्या हस्ते करण्यात आले. एनडीए देशात हॅटट्रिक साधणार असल्याचा दावा सूद यांनी यावेळी केला.

यावेळी आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक अमय चोपडेकर, राज्य भाजप सदस्य जयंत जाधव, वास्को भाजप प्रभारी अनिथा थोरात, पूजा नाईक, अंकिता सातार्डेकर, संदीप नार्वेकर, प्रशांत नार्वेकर व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशिष सूद यांनी यावेळी सांगितले की, भाजप हा संघटित पक्ष असून या पक्षाची भूमिका जनतेच्या हितासाठी आहे. काँग्रेस हा धर्म न मानणार पक्ष असल्याने आज त्याची खालच्या दर्जाची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपने गरिबांना विविध योजना राबवून त्यांना त्याचा हक्क देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

वास्कोतून धेंपेंना १८ हजार मते : साळकर

आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले की, या मतदार संघातून भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना मतांची टक्केवारी वाढवून देण्यात कार्यकर्ता वचनबद्ध आहे. वास्कोतून लोकसभा निवडणुकीत १८ हजार मते भाजपला मिळणार असल्याची खात्री साळकर यांनी दिली.

यावेळी भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, प्रशांत नार्वेकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT