Loksabha Election  Dainik Gomatnak
गोवा

Loksabha Election : पल्लवी धेंपे यांना बहुमतांनी निवडून द्या! कृषिमंत्री रवी नाईक

Loksabha Election : कुर्टी-खांडेपार फोंड्यात प्रचार

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

फोंडा, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या धेंपे समूहामुळे राज्यात सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. खाणींसारख्या उद्योगातून गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करण्यात आला.

आता औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातून धेंपे कुटुंबीय राजकारणात शिरत असून शिक्षण संस्था योग्यरित्या चालवणाऱ्या पल्लवी धेंपे यांना फोंडा मतदारसंघातून बहुमत द्या, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले.

कुर्टी - फोंडा भागात आज (बुधवारी) दक्षिण गोव्याच्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी कुर्टी - खांडेपार पंचायतीसह फोंडा शहराचा प्रचार दौरा केला. या भागातील विविध मंदिरांना भेटी देत आशीर्वाद घेतले तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला.

या प्रचार दौऱ्याला कृषीमंत्री रवी नाईक यांच्यासमवेत माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, फोंड्याचे नगरसेवक आनंद नाईक,

रूपक देसाई, शौनक बोरकर, वीरेंद्र ढवळीकर, कुर्टी - खांडेपार पंचायतीचे सरपंच हरेश नाईक तसेच पंचायत सदस्य मनिष नाईक, अभिजीत गावडे, उद्योजक संदीप खांडेपारकर, भाजपचे इतर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले की, पल्लवी धेंपे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध संस्था चालवल्या आहेत, शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुलांना काय लाभ मिळेल, याकडे धेंपे कुटुंबाने लक्ष केंद्रीत केले, त्यामुळेच आतापर्यंत अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोचले.

दक्षिण गोव्याच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍वास दाखवला, त्यामुळे आज एक महिला दक्षिण गोव्याची खासदार होणार आहे, आणि त्यासाठी मतदारांनी मोठ्या मताधिक्क्याने पल्लवी धेंपे यांना निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुर्डी - खांडेपारहून सुरवात...

सकाळी मुर्डी - खांडेपारहून प्रचाराला सुरवात करण्यात आली. येथील विठोबा देवस्थानात आशीर्वाद घेतल्यानंतर खांडेपार येथील पद्माकर आश्रम, शांतादुर्गा देवस्थान, ओपा येथील मंडप तसेच कुर्टी येथील शांतादुर्गा देवस्थान, प्रभूनगर व इतर देवस्थानांसह फोंड्यातील जबाबदार नागरिकांशी संवाद साधण्यात आला.

मोदीजींचा विश्‍वास सार्थ ठरवा!

भाजपतर्फे आपल्याला दक्षिण गोव्याच्या उमेदवारीची तिकीट देण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्यावर विश्‍वास ठेवला आहे, हा विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी आपल्याला मतदान करा, असे आवाहन पल्लवी धेंपे यांनी केले.

दक्षिण गोव्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून मडगावात आपले कार्यालय असेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! सुसाट वेगानं येणाऱ्या कारसमोर अचानक आली चिमुकली अन्... कॅमेऱ्यात कैद झालेला तो भयानक थरार पाहाच

Surya Gochar 2026: नोकरीत पदोन्नती अन् बॉसचे कौतुक! 13 सप्टेंबरपासून सूर्यदेव बनवणार श्रीमंत; 3 राशींच्या भाग्योदयाचा महायोग

Goa Coconut Price: गणेशोत्सवात नारळ महागला, पण ग्राहकांना मिळणार स्वस्तात! 70 हजार नारळांची खरेदी; राज्यभरातील 17 केंद्रांवर 38 रुपयांत विक्री

Goa politics: उज्ज्वला योजनेवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप! 'आम्ही विरोधात नाही, सर्व एलपीजीधारकांना लाभ द्या'; सावियो कुतिन्हों यांचा दावा

Seva Sankalp Campaign: महिनाभर 'सेवा संकल्प' अभियान; 17 सप्टेंबरपासून राज्यात सरकार राबविणार 12 उपक्रम

SCROLL FOR NEXT