Viral Video: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! सुसाट वेगानं येणाऱ्या कारसमोर अचानक आली चिमुकली अन्... कॅमेऱ्यात कैद झालेला तो भयानक थरार पाहाच

Viral Video Little Girl Car Accident: काही वेळा एखादा अपघात घडण्यासाठी अवघे काही सेकंद पुरेसे असतात. मात्र त्याच क्षणी घेतलेला योग्य निर्णय एखाद्याचा जीवही वाचवू शकतो.
Viral Video Little Girl Car Accident
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

काही वेळा एखादा अपघात घडण्यासाठी अवघे काही सेकंद पुरेसे असतात. मात्र त्याच क्षणी घेतलेला योग्य निर्णय एखाद्याचा जीवही वाचवू शकतो. मेक्सिकोमधील असाच एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका चिमुकलीचा संभाव्य अपघात एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे टळल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या कडेला आपापल्या कामात व्यस्त असताना त्या व्यक्तीची अचानक एका लहान मुलीकडे नजर जाते.

चिमुकली हळूहळू रस्त्याकडे जात होती

व्हिडिओमध्ये चिमुकली कोणाच्याही लक्षात न येता हळूहळू रस्त्याच्या दिशेने पुढे जाताना दिसते. तिला समोर असलेल्या धोक्याची कल्पना नसल्याचे तिच्या हालचालींवरून जाणवते. तेवढ्यात त्या व्यक्तीला परिस्थिती लक्षात येते आणि तो तातडीने मुलीच्या दिशेने धाव घेतो. त्याच वेळी एका महिलेलाही मुलगी रस्त्यावर जात असल्याचे लक्षात येते आणि ती तिला थांबवण्यासाठी धावते. मात्र मुलीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिचा तोल जातो आणि ती रस्त्यावर पडते.

समोरून वेगाने आली कार

परिस्थिती गंभीर होत असतानाच समोरून एक कार येताना दिसते. चिमुकली रस्त्यावर असल्याने काही क्षणांत मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. कारचालकाचेही मुलीकडे लक्ष जाते आणि तो तातडीने ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचवेळी मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी आधीच धावत असलेली व्यक्ती तिच्याजवळ पोहोचते. त्याने क्षणाचाही विलंब न करता मुलीला रस्त्यापासून दूर खेचले आणि संभाव्य दुर्घटना टाळली.

Viral Video Little Girl Car Accident
Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

मुलीला सुरक्षित ठिकाणी नेले

मुलीला वाचवताना ती व्यक्ती आणि चिमुकली दोघेही रस्त्यावर पडतात. मात्र तो लगेच उठतो आणि मुलीला तिच्यासोबत असलेल्या महिलेकडे सोपवतो. मुलगी सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर तो तेथून निघून जातो. या संपूर्ण घटनेत त्याने केलेली कृती विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. कारण जीव वाचवल्यानंतरही त्याने कोणत्याही प्रसिद्धीची किंवा कौतुकाची अपेक्षा न करता पुन्हा आपल्या कामाकडे मोर्चा वळवला.

Viral Video Little Girl Car Accident
Goa politics: उज्ज्वला योजनेवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप! 'आम्ही विरोधात नाही, सर्व एलपीजीधारकांना लाभ द्या'; सावियो कुतिन्हों यांचा दावा

काही सेकंदांनी बदलू शकला असता संपूर्ण प्रसंग

या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्या व्यक्तीच्या प्रसंगावधानाचे कौतुक करत आहेत. त्याने योग्य वेळी मागे वळून पाहिले नसते किंवा मुलीपर्यंत पोहोचण्यास काही सेकंदांचा उशीर झाला असता, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकली असती. या घटनेतून रस्त्याच्या आसपास लहान मुलांवर लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. तसेच संकटाच्या क्षणी घाबरून न जाता तातडीने घेतलेला निर्णय किती मोठा फरक घडवू शकतो, याचे हे उदाहरण ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com