Goa politics: उज्ज्वला योजनेवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप! 'आम्ही विरोधात नाही, सर्व एलपीजीधारकांना लाभ द्या'; सावियो कुतिन्हों यांचा दावा

Savio Coutinho Ujjwala Scheme: काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सावियो कुतिन्हो यांनी भाजप सरकार आणि विशेषतः मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर जोरदार टीका केली.
Savio Coutinho Ujjwala Scheme
Goa politicsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सावियो कुतिन्हो यांनी भाजप सरकार आणि विशेषतः मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष लाभार्थ्यांना ‘उज्ज्वला योजना’ मिळवून देण्याच्या विरोधात आहे, असा खोटा प्रचार केला जात आहे.

कुतिन्हो यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षाने असे कोणतेही विधान केलेले नाही, उलट भाजपच्या २०२२च्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व ‘एलपीजी’ कनेक्शनधारकांना त्याचे लाभ मिळावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने अशीही मागणी केली की, सरकारने ही योजना केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी असेल, अशी अधिकृत घोषणा करावी.

Savio Coutinho Ujjwala Scheme
Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

अर्जाच्या नमुन्यात ‘घोषणापत्र’ समाविष्ट करण्यामागच्या हेतूबाबत प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात शंका निर्माण झाली होती. जेव्हा या प्रकरणावर कडाडून टीका झाली आणि सत्य समोर आले, तेव्हाच सरकारने स्पष्टीकरण दिले की ‘उज्ज्वला योजने’चा लाभ घेतल्यास ‘गृह आधार’ व ‘डीएसएस’ योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही.

अर्जाची प्रक्रिया सुलभ करावी!

अर्जाची प्रक्रिया सुलभ केली जावी, जेणेकरून अर्जदार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज सहजपणे डाउनलोड करू शकतील आणि थेट नियुक्त ठिकाणी तो जमा करू शकतील. काँग्रेस पक्षाने पुढे असेही म्हटले की, या योजनेद्वारे वितरित केली जाणारी रक्कम ही जनतेच्या पैशांतून (सार्वजनिक निधीतून) दिली जाते, त्यामुळे विभागाने हे सुनिश्चित केले पाहिजे की केवळ भाजपचे समर्थकच नव्हे, तर प्रत्येक पात्र अर्जदाराला याचा लाभ मिळेल.

Savio Coutinho Ujjwala Scheme
Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com