Loksabha Election Voting Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election Voting : वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी मतदानाची व्यवस्था करा; शॅडो कौन्सिलची मागणी

Loksabha Election Voting : गोव्यातील अनेक वृद्धाश्रमांमधील वृद्धांसाठी मतदान व्यवस्थेची शक्यता पडताळून पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election Voting :

मडगाव, शंभर टक्के मतदान करण्याच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मडगावच्या शॅडो कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच दक्षिण जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू यांची भेट घेतली.

गोव्यातील अनेक वृद्धाश्रमांमधील वृद्धांसाठी मतदान व्यवस्थेची शक्यता पडताळून पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शंभर टक्के मतदानाचे ध्येय साध्य करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना दक्षिण गोवा मतदारसंघातील अनेक वृद्धाश्रमांकडे त्यांनी लक्ष वेधले. तेथे शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोक राहतात. यापैकी काहीजणांची ते सध्या राहात असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत नोंदणी केली जाते, तर काहींची त्यांच्या मूळ निवासस्थानाच्या भागातील मतदार यादीत नोंदणी केली जाते, ही तफावत यावेळी नजरेस आणून देण्यात आली.

काणा - बाणावली येथील वृद्धाश्रमात आणि मतदारसंघातील इतर वृद्धाश्रमांमध्ये काही अधिकारी पाठवावेत, अशी विनंती आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रू यांना केली आहे. जेणेकरून तेथील वृद्धांना सोयीस्करपणे मतदान करता येईल, असे कुतिन्हो म्हणाले. शॅडो कौन्सिलच्या शिष्टमंडळामध्ये कुतिन्हो यांच्यासह रॉबर्ट वाझ, लालन पार्सेकर, दामोदर वंसकर यांचा समावेश होता.

मतदान हक्कापासून वंचित

वृद्धाश्रमांच्या व्यवस्थापनासमोर येणाऱ्या अडचणींमुळे या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. एक तर वाहतूक सुविधांच्या कमतरतेमुळे किंवा वृद्ध हरविण्याच्या जोखमीमुळे ही परिस्थिती ओढवते. खरे तर आम्हाला आश्चर्य वाटते की, त्या त्या भागातील संबंधित बीएलओ संबंधित अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा का आणत नाहीत, असे शॅडो कौन्सिलने नमूद केले आहे.

घरबसल्या मतदानाचा पर्याय :

आम्ही काणा - बाणावली येथील दि डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंटमध्ये राहणाऱ्या वृद्धांचे/केअरटेकर्सचे ‘१२-डी’ प्रकारचे २८ अर्ज भरले आहेत. ते आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. या मतदारांना घरबसल्या मतदानाचा पर्याय उपलब्ध करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती त्यांना केली आहे, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT