congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : दोन्ही जागांवर काँग्रेस जिंकणार : माणिकराव ठाकरे

Goa Congress : भाजपच्या खोटारड्या प्रचाराला जनता कंटाळली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress :

पणजी, काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार, गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसचा विजय निश्‍चित आहे.

देशातील जनता भाजपच्या खोटारड्या प्रचाराला कंटाळली आहे. त्यामुळे जनता यावेळी भाजपसोबत नाही. गोव्यात काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी पक्षासाठी काम केले. मात्र जर कोणी केलेले नसेल, तर त्याची माहिती माझ्यापर्यंत येईल, असे गोव्याचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले.

इंडी आघाडीत फूट पाडण्यासाठी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, यावेळी देशातील जनता त्यांच्या या आश्‍वासनाला भुललेली नाही, असे ठाकरे म्हणाले. देशात पंतप्रधानांनी जी वक्तव्ये केली आहेत यावरून त्यांचे मनोबल खचलेले आहे. त्या वक्तव्यावरून भाजप यावेळी घाबरलेली आहे.

त्यांना ४०० वर जागा नव्हे तर बहुमतही मिळणार नाही, अशी स्थिती आहे. चुकांच्या आधारे व खोटारड्या पद्धतीने प्रचार करून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील जनता त्रस्त झाली आहे. आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यासोबत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने भाजपने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.

उद्योग बंद पाडू, अशा धमक्याही दिल्या. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते ठाम राहिले. काँग्रेसविरोधात अनेक वावड्या उठविल्या जात आहेत. भाजपचे हे षडयंत्र असून इंडी आघाडीत फूट पाडून आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांना शक्य झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

इंडी आघाडी सर्व निवडणुका लढवणार

गोव्यात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात उपस्थित राहू शकलो नाही. त्यामुळे प्रचार तसेच मतदानाचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आलो आहे. आजच्या बैठकीत काँग्रेस नेते तसेच आमदारांनी गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस जिंकणार, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

यावेळी गोव्यातील संघटनात्मक दृष्टीतूनही काय पावले उचलणे अपेक्षित आहे, यावरही चर्चा झाली. लोकसभेपुरती इंडी आघाडी नसून आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढवल्या जातील, असेही ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT