Congress leader Shashi Tharoor  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Manish Jadhav

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील दोन्ही जागा पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने जिंकण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी भाजपला निकराचा लढा देत आहे. राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित करुन भाजपवर निशाणा साधला जात आहे. दोन्ही पक्षातील बडे-बडे नेते प्रचारसभा घेऊन राळ उडवून देतायेत.

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरुर यांनी गोव्यातून भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी शुक्रवारी गोव्यातील लोकांना लोकशाही, विविधता, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि ‘वॉशिंग मशीन राजकारण’ रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. थरुर यांनी शुक्रवारी काँग्रेस हाऊस येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले.

थरुर म्हणाले की, ‘गोव्यातील लोक लोकशाही आणि भारतीय संविधानाची मूल्ये जपतात.’ या पत्रकार परिषदेला एआयसीसी प्रभारी माणिकराव ठाकरे, जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि सरचिटणीस विजय भिके उपस्थित होते.

“भारत सध्या कठिण काळात जात आहे. आम्ही काही क्षेत्रांमध्ये खूप प्रगती केली आहे. दुर्दैवाने आपल्याला धक्केही बसले. परंतु आज आपण पाहत आहोत तो सर्वात मोठा धोका आपल्या लोकशाहीला आहे. गेल्या काही वर्षांत भाजपच्या राजवटीत एक पक्ष प्रत्येक गोष्टीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे,” असे थरुर म्हणाले. थरुर पुढे म्हणाले की, तपास यंत्रणांचा वापर करुन निवडक विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. भाजपचे वॉशिंग मशीन त्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे गुन्हे साफ करते. त्यांच्यावरील आरोप अचानक गायब होतात.”

तीन रेषीय प्रकल्पांमुळे गोव्याचे पर्यावरण धोक्यात आल्याचेही त्यांनाी यावेळी नमूद केले. थरुर पुढे म्हणाले की, “लोकशाही पुनर्संचयित करणे आणि त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. आपण आपली विविधता जपली पाहिजे. राष्ट्रीय विरोधी पक्षाच्या नेत्याला तुरुंगात बंद करुन भाजपने आपली कमजोरी आणि हताशा दाखवली आहे.’’

ते पुढे म्हणाले की, ‘’भाजपची दोन कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणे ही आश्वासने जुमला ठरली. तो जुमला असल्याचे स्वत: अमित शाह म्हणाले. पण आम्ही आश्वासने देतो ती प्रत्यक्षात आणतो. दुहेरी नागरिकत्वासाठी कायदेशीर फॉर्म्युला शोधण्याची गरज आहे. ही निवडणुक भाजपला जड चालली आहे. आम्हाला निवडणुकीच्या दोन टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी भाषिक राज्यांमधूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.”

पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत केला जाईल, असेही ते पुढे म्हणाले. “भाजपला एक राष्ट्र-एक निवडणूक, एक पक्ष-एक नेता, एक धर्म-एक देव आणि एक भाषा हवी आहे, त्यांना सर्व काही 'एक' हवे आहे.. आणि अर्थातच या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा एक राज्यकर्ता.. ही भारताची कल्पना नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलेला भारत हा नाही,” असे म्हणत थरुर यांनी भाजपवर निशाणा साधला.

“गुजरातमध्ये 1971 च्या युद्धात बुडालेल्या आयएनएस खुकरी या भारतीय नौदलाच्या जहाजाचे स्मारक आहे. येथे तुम्हाला जहाजाची प्रतिकृती आणि भिंतीवर शहिद झालेल्या प्रत्येक सैनिक आणि खलाशी यांची नावे दिसतील. जेव्हा तुम्ही सर्व नावे पाहता तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, कारण तुम्ही पाहाल की देशातील प्रत्येक धर्म, जात आणि प्रदेश मधून हे सैनक देशासाठी लढले. ते एका धर्माचे किंवा देशाच्या एका भागाचे नव्हते,” असेही शेवटी थरुर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT