Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : वाळपईतील स्वाभिमानी जनता काँग्रेससोबत : ॲड. रमाकांत खलप

Valpoi News : बाजारात प्रचार, आघाडीचा लाभ होणार; यावेळी वाळपई मतदार संघातून काँग्रेस पक्षाला आघाडीची मते मिळणार आहेत. कारण वाळपईतील स्वाभिमानी जनता ही काँग्रेस पक्षासोबतच राहणार आहे, असा विश्वास उत्तर गोवा काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, सत्तरी तालुक्याचा काँग्रेस पक्षामुळे सर्वांगीण विकास झालेला आहे. या तालुक्यात काँग्रेसची ज्येष्ठ माणसे आहेत.

त्यामुळे वाळपई मतदारसंघात आजही काँग्रेस पक्षाला कोणीही विसरलेले नाही. आपल्याला देखील वाळपईची जनता चांगली ओळखून आहे. कारण ती स्वाभिमानी जनता आहे. म्हणूनच यावेळी वाळपई मतदार संघातून काँग्रेस पक्षाला आघाडीची मते मिळणार आहेत. कारण वाळपईतील स्वाभिमानी जनता ही काँग्रेस पक्षासोबतच राहणार आहे, असा विश्वास उत्तर गोवा काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केला आहे.

वाळपईत बुधवारी सायंकाळी बाजारात प्रचारावेळी खलप बोलत होते. यावेळी वाळपई काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा नेने, जिल्हा उपाध्यक्ष अँड. भालचंद्र मयेकर, राज्य जनरल सेक्रेटरी मनीषा उसगावकर, तृणमूल काँग्रेसचे अँड. गणपत गावकर, काँग्रेस महिला उपाध्यक्ष रोशन देसाई, रणजीत राणे, आसले पिन्हो आशीष काणेकर, नंदकुमार कोपर्डेकर उपस्थिती होते.

मनीषा उसगावकर म्हणाल्या, खलप यांची ओळख करुन द्यायची गरज नाही. दुकानदार स्वत: बाहेर येऊन आदराने खलपांचे स्वागत करतात. हेच मोठे काँग्रेससाठी आहे.

उच्चशिक्षित उमेदवार

रणजीत राणे म्हणाले, खलप हे उच्च शिक्षित उमेदवार असून कार्यक्षम असे नेते आहेत. त्यांचे राजकीय योगदान फार मोठे असून सत्तरीतील ज्वलंत विषय लोकसभेत मांडणार नेता निवडायचा आहे.

मागील पंचवीस वर्षात उत्तरेतून जो खासदार पाठविला होता. तो मौन बाळगलेला खासदार होता. पंचवीस वर्षात लोकसभेत सत्तरीची समस्या मांडलेली नाही. म्हणूनच आता चांगला संसदपट्टू लोकसभेत पाठवायचा आहे. जो खरा न्याय देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

Goa Electricity: गोव्यात विजेची मागणी वाढणार दुपटीने! औद्योगिक उत्पादनात होणार वाढ; लोह-पोलाद उद्योग आघाडीवर

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

India Pakistan Tension: 'भारत- पाकिस्तानमधील अणुयुद्ध मी थांबविले'! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

SCROLL FOR NEXT