Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Rahu Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा एक छाया ग्रह मानला जातो, जो नेहमी वक्री म्हणजेच उलट्या चालीने प्रवास करतो.
Horoscope
HoroscopeDainik Gomantak
Published on
Updated on

Rahu Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा एक छाया ग्रह मानला जातो, जो नेहमी वक्री म्हणजेच उलट्या चालीने प्रवास करतो. विशेष म्हणजे, 30 डिसेंबर 2025 रोजी राहू ग्रह 18 अंशांवर (Degree) विराजमान होता. राहूची चाल वक्री असल्याने त्याचा अंश बल 18 अंशांकडून कमी होत 12 अंशांकडे सरकणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रातील सिद्धांतानुसार, जेव्हा एखादा ग्रह 12 ते 18 अंशांच्या दरम्यान असतो, तेव्हा त्या स्थितीला 'युवावस्था' असे म्हटले जाते. राहूची ही युवावस्था 30 डिसेंबर 2025 पासून सुरु झाली असून ती 15 एप्रिल 2026 पर्यंत (राहू 12 अंशावर येईपर्यंत) कायम राहणार आहे. ग्रहाच्या या प्रबळ स्थितीचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव धनु, कुंभ आणि मीन या तीन राशींवर पडणार असून त्यांच्या जीवनात मोठे बदल अपेक्षित आहेत.

धनु राशीच्या लोकांसाठी राहूचा हा गोचर काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. राहू युवावस्थेत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात अभूतपूर्व प्रगतीची संधी मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याचे योग आहेत. केवळ पदोन्नतीच नाही, तर कार्यक्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल.

विशेषतः प्रसारमाध्यमे आणि व्यापार क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा असेल. एखाद्या परदेशी कंपनीसोबत काम करण्याची संधी किंवा कामानिमित्त परदेश वारी करण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. या शुभ फलांमध्ये वृद्धी व्हावी म्हणून धनु राशीच्या लोकांनी दररोज सकाळी ‘ॐ रां राहवे नमः’ या मंत्राचा जप करावा आणि बुधवारी हिरव्या मुगाचे दान करावे.

Horoscope
Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

कुंभ राशीच्या जातकांसाठी राहूची ही स्थिती दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करणारी ठरेल. राहूच्या प्रभावामुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील, ज्यामुळे पगारवाढ आणि पदोन्नतीचे आनंदाचे वृत्त मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला एखादी मोठी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते, जी तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया ठरेल. आर्थिक लाभासोबतच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. या कालावधीत राहूचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे आणि भगवान गणेशाची मनोभावे पूजा करावी.

Horoscope
Horoscope: नव्या सप्ताहाची दमदार सुरुवात! 'या' राशींना मिळणार करिअरमध्ये मोठी संधी, वाचा भविष्य

तसेच, मीन राशीवरही राहूच्या या युवावस्थेचा विशेष प्रभाव पडणार आहे. राहू ग्रह मीन राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे नवनवीन मार्ग खुले करेल. तुम्हाला अनपेक्षित मार्गांनी पैसा मिळू शकतो आणि समाजात मानसन्मान प्राप्त होईल. या काळात कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचताना घाई न करता विचारपूर्वक पावले उचलणे हितकारक ठरेल. एखाद्या प्रतिष्ठित किंवा प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रलंबित कामे गतीने मार्गी लागतील. मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात अधिक लाभ मिळवण्यासाठी शुक्रवारी दुधाचे दान करावे, ज्यामुळे चंद्राची आणि राहूची कृपा आपणास प्राप्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com