Goa Tradition : प्राचीन परंपरा, चालीरितींचा पर्यावरणाशी घनिष्ट संबंध : राज्यपाल श्रीधरन पिल्लई

Goa Tradition : हा कार्यक्रम आपला समृद्ध पर्यावरणीय वारसा अधोरेखित करण्यासाठी आणि आपल्या लोकांना विशेषत: तरुण पिढीला आमच्या पूर्वजांची अद्भुत परंपरा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारा होता.
Goa Tradition
Goa Tradition Dainik Gomantak

Goa Tradition :

पणजी, प्राचीन परंपरा, विधी आणि चालीरीतींचा पर्यावरण आणि पर्यावरणाशी घनिष्ट संबंध आहे,असे प्रतिपादन राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी केले.

देशात आढळणाऱ्या पारंपरिक वृक्षांचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि पर्यावरणीय महत्त्व उलगडून दाखवणारा ''वृक्ष विज्ञान सदासु'' हा विशेष परिसंवाद पणजी येथील राजभवन येथील नवीन दरबार हॉलमध्ये रविवारी पार पडला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

हा कार्यक्रम आपला समृद्ध पर्यावरणीय वारसा अधोरेखित करण्यासाठी आणि आपल्या लोकांना विशेषत: तरुण पिढीला आमच्या पूर्वजांची अद्भुत परंपरा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारा होता. या परिसंवादाला शेकडो विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Goa Tradition
Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

राजभवन येथील नवीन दरबार हॉलमध्ये देशातील वृक्षांविषयी अधिक तपशील व विविध पैलूंवरील संबंध यावर चर्चासत्रात अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात एमआरएम राव, राज्यपालांचे सचिव, मिहीर वर्धन, राज्यपालांचे विशिष्ट अधिकारी, हरिलाल मेनन, कुलगुरू, सी अचलेदर रेड्डी, अध्यक्ष राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, पैपरा राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.

Goa Tradition
Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

पारंपरिक वृक्षांबाबत जागृतीपर उपक्रम

गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी हाती घेतलेल्या नैसर्गिक वारसा यात्रेच्या अनुषंगाने ''वृक्ष विज्ञानिका सदासु'' या भारतातील पारंपारिक वृक्षांवरील हा परिसंवाद राजभवनात एक उत्कट प्रयत्न होता.

राज्यपाल पिल्लई यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये ‘हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. भारतातील लोकांच्या जीवनात आणि संस्कृतीत वृक्षांचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com