subhash Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Agonda News : कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर क्रियाशीर रहावे : मंत्री सुभाष फळदेसाई

Agonda News : पल्लवी धेंपेंच्या विजयाचा विश्वास

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News :

आगोंद, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याचे प्रभारी तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल आमोणे, लोलये व आगोंद येथील शक्ती केंद्र प्रमुख बूथ समिती, प्रमुख कार्यकर्ते, पन्ना प्रमुख यानां मार्गदर्शन केले.

प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथवर क्रियाशील राहण्याचा सल्ला दिला. आपला बूथ मजबूत करण्यासाठी प्रयत्न करून सौ. पल्लवी धेंपे या भाजप उमेदवाराला या मतदारसंघात १० हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

आगोंद येथील रजनी पायक सभागृहात भाजप पन्ना प्रमुखांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्थानिक सरपंच प्रितल फर्नांडिस, उपसरपंच कॅनिशा फर्नांडिस, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस विशांत गावकर, शक्ती केंद्र प्रमुख शाबा नाईक गावकर, नारायण देसाई, सचिव संजू तिळवे, युवा अध्यक्ष रजनीश कोमरपंत उपस्थित होते.

सुरवातीस सरपंच फर्नांडिस यांनी मंत्री फळदेसाई व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

विशाल देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात भाजप कार्यकर्ते गेल्यावेळची कमी भरून काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामदास बा. सावंत यांनी तर विशांत गावकर यांनी आभार व्यक्त केले.

आमोणेतही कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा

सकाळच्या सत्रात गावडोंगरी व खोतिगाव पंचायत क्षेत्रातील भाजप प्रमुख कार्यकर्त्यांसाठी आमोणे येथे आयोजित कार्यशाळेत दक्षिण गोवा प्रभारी व मंत्री फळदेसाई, प्रदेश सचिव व दक्षिण गोवा प्रभारी सर्वानंद भगत,

खोतिगावचे सरपंच आनंदू देसाई, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, विशांत गावकर, रजनीश कोमरपंत उपस्थित होते. या कार्यशाळेला सर्वानंद भगत व सुभाष फळदेसाई यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर लोलये पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांना निराकार सभागृहात मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

SCROLL FOR NEXT