Goa News : गोव्याची ओळख गुन्ह्यांची राजधानी ! कॅ. विरियातो फर्नांडिस

Goa News : केपेतील काँग्रेस मेळाव्यात भाजपवर टीकास्त्र
Goa  Captain Viriato Fernandes
Goa Captain Viriato FernandesDainik Gomantak

Goa News :

केपे, गोवा राज्याची ओळख आता खून, बलात्कार, अमलीपदार्थ तसेच बेरोजगारीची राजधानी म्हणून प्रसिद्ध झाली आहे, असे काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोवा उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. केपे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्‍टा व इतर मान्यवर उपस्थित होते. पं. जवाहरलाल नेहरू यांनी गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त केले. पण खऱ्या अर्थाने आम्ही मुक्तपणे जगत आहोत का, असा प्रश्न पडला आहे.

राज्यातील सरकार सामान्य लोकांसाठी काम करीत नाही, ते फक्त इव्हेंट आयोजित करून करोडो रुपये खर्च करीत आहे व यामुळे आज आमच्या प्रत्येकावर अडीच लाखांचे कर्ज आहे.

भाजपाने फक्त बड्या उद्योगपतींना फायदा मिळवून देण्यासाठी रेल्वे दुपदरीकरण, तामनार प्रकल्प व कोळसा वाहतूक करण्याचा डाव आखला आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाबरोबर राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसने एक चांगला उमेदवार दक्षिण गोव्यातील लोकांसाठी दिला आहे. कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी लोकांसाठी आवाज उठविण्याचे काम अनेकवेळा केले आहे व यासाठी लोकांचे मुद्दे व प्रश्न मांडण्यासाठी त्यांना लोकसभेत पाठविणे आमचे कर्तव्य असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Goa  Captain Viriato Fernandes
Lok Sabha Election: लोकसभेच्‍या मतोत्‍सवाला लाभणार पर्यावरणीय साज

काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला तरी एक चांगला उमेदवार दक्षिण गोव्यातील जनतेसाठी दिला आहे, असे एल्टन डिकॉस्‍टा यांनी सांगितले. विरियातो फर्नांडिस राज्यातील लोकांना नको असलेल्या प्रकल्पांना विरोधासाठी लोकांबरोबर ते रस्त्यावर उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान करणार लोकांनी ते ठरविले पाहिजे. एका बाजूने लोकांसाठी कधीही उपलब्ध असणारी व्यक्ती तर दुसऱ्या बाजूने अपॉइंटमेंटसाठी दहा दिवस वाट पाहत रहावी लागणारी व्यक्ती. यातील एका व्यक्तीला आपण मतदान करायचे असल्याने लोकांनी योग्य तो निर्णय घेऊन लोकांसाठी काम करणाऱ्या फर्नांडिस यांना लोकसभेत पाठवावे.

— एल्टन डिकॉस्‍टा, आमदार केपे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com