डिचोली, लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.7) होणाऱ्या मतदानासाठी डिचोलीत निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
डिचोली तालुक्यात डिचोलीसह साखळी आणि मये मिळून तीन विधानसभा मतदारसंघ येत असून तिन्ही मतदारसंघात मिळून १४१ मतदान केंद्रे आहेत. ४१,८९० पुरुष तर ४३,७३७ महिला मिळून ८५,६२७ मतदार आहेत. सोमवारी दुपारपर्यंत निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांचा ताबा घेणार आहेत. सुरक्षेसाठी सशस्त्र पोलिसांसह सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
साखळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५० तर मयेत ४८ मतदान केंद्रे आहेत. डिचोलीत ४३ मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघात पिंक, पर्यावरणपुरक, मॉडर्न बूथसह, दिव्यांगांसाठी बूथांची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत बूथ सजावटीचे काम चालू होते.
डिचोली तालुक्यासाठी सचिन देसाई हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.