South Goa  Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिणेत भाजपला ६० हजारांचे मताधिक्‍य : फळदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

वास्को, लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना ६० हजारांचे मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍‍वास समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला. मात्र त्‍यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने कार्य केले पाहिजे.

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती मतदारापर्यंत पोहोचविली पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

मुरगाव मतदारसंघात सडा-वास्‍को येथील आंबेडकर सभागृहात भाजपच्‍या पन्नाप्रमुखांची बैठक झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फळदेसाई बोलत होते.

व्‍यासपीठावर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, मुरगाव भाजप प्रभारी संतोष केरकर, डॉ. धमेंद्र प्रभुदेसाई, सीमा परब, महेश मांद्रेकर उपस्थित होते.

आमदार कृष्णा साळकर म्‍हणाले, भाजपच्‍या पन्नाप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रत्येकासमोर मांडणे गरजेचे आहे. भाजप सर्वधर्मींयांना घेऊन कार्य करणारा पक्ष आहे. तर, संजय सातार्डेकर यांनी सांगितले की, या निवडणुकीत पन्नाप्रमुखांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT