Lok Sabha Polls Date Dainik Gomantak
गोवा

LS Polls: लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता! गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे

Kavya Powar

Lok Sabha Polls Date: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीची तारीख ही 2024च्या एप्रिलमध्ये निश्चित होण्याची शक्यता आहे.

या तारखेचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सूचना पाठवल्या असल्याचे रमेश वर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, सत्ताधारी पक्ष भाजपला पराभूत करण्यासाठी म्हणून इतर पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीची चाचपणी घेतली जात असताना राजकीय पक्ष यापुर्वीपासून या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने गोव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुख्य शाखेच्या अंतर्गत राज्य युनिटसाठी पाच उपाध्यक्षांची नियुक्ती केली असून, पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि.26 सप्टेंबर) 27 सदस्यांची यादी जाहीर करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT