Fontainhas Issue Dainik Gomantak
गोवा

Tourist in Goa: पर्यटकांच्या वागणुकीमुळे पणजीवासीय नाराज; स्थानिकांच्या मदतीसाठी बाबूश मोन्सेरात सज्ज

Fontainhas Issue: फॉन्टेनहास आणि आजूबाजूला राहणारे स्थानिक सध्या पर्यटकांमुळे होणाऱ्या वारंवार त्रासामुळे नाराज आहेत, बाबूश मोन्सेरात यांनी स्थानिकांना लिखित स्वरूपात त्यांना होणारे त्रास मांडायला सांगितले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी शहरातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देत तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला. फॉन्टेनहास आणि आजूबाजूला राहणारे स्थानिक सध्या पर्यटकांमुळे होणाऱ्या वारंवार त्रासामुळे नाराज झाले आहेत. चित्रपट सृष्टीमुळे पर्यटकांच्या मनात या भागाने भुरळ पडली आहे, त्यांना या परिसराची अधिक ओढ आहे.

इथे येऊन पर्यटक विविध ठिकाणी फोटो काढतात आणि स्थानिकांना मात्र यामुळे त्रास सहन करावा लागतोय, रहिवाशांना एकांत अनुभवता येत नाही. स्थानिकांनी शनिवारी (दि. १९ ऑक्टोबर) रोज बाबूश मोन्सेरात यांच्याशी झालेल्या भेटीत या सर्व प्रकरणाचा उलघडा केला.

बाबूश मोन्सेरात यांनी स्थानिकांना लिखित स्वरूपात त्यांना होणारे त्रास मांडायला सांगितले आहेत आणि सोबतच हे त्रास कसे सोडवण्यात यावेत याची देखील उपाय सुचवायला सांगितले आहेत आणि लवकरच हे सर्व प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिलेय.

स्थानिकांनी खूप कष्ट घेऊन ही घरं बनवली आहेत आणि काही पर्यटक मात्र बेधुंद अवस्थेत इथे येऊन हवे तसे वावरात, स्थानिकांना सर्व पर्यटकांबद्दल आक्षेप नाही मात्र दारू पिऊन वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक लोकांना नक्कीच त्रास सहन करावा लागतोय. पर्यटन विभागाकडून राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी काही नियम तयार केलेले आहेत मात्र याचे पालन कोणीही करत नसल्याचं मोन्सेरात म्हणालेत.

सोबतच बाबूश मोन्सेरात यांनी पोलीस पेट्रोलिंगबद्दल सुद्धा एक प्रश्न उभा केलाय. या भागात पोलीस पेट्रोलिंगची गरज आहे, मात्र तरीही पोलीस पुरेसा स्टाफ नसल्याचं कारण देऊन टाळाटाळ करतायत.राज्यात पुरेसा पोलीसफोर्स असून देखील असा प्रश्न का उभा राहावा? असं मोन्सेरात यांचं म्हणणं आहे.

या ठिकाणी पर्यटकांसाठी इंग्रजीमध्ये नियमफलक बनवले गेलेत मात्र कदाचित इथे येणारे पर्यटक हिंदी भाषिक असतील आणि म्हणून त्यांच्यासाठी हिंदीमधून बोर्ड तयार केले गेले पाहिजेत असेही मोन्सेरात म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT