Sadayen Siolim citizen Dainik Gomantak
गोवा

Goa : सडयें-शिवोलीत अनियमित पाणीपुरठ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

सडयें तसेच मार्ना शिवोलीत (Siolim) गेले पाच दिवस अनिमयीत पाण्याचा पुरवठा होत असून त्यामुळे स्थानिक नागरिक (Local citizen) त्रस्त झाले आहेत .

दैनिक गोमन्तक

शिवोली : सडयें तसेच मार्ना शिवोलीत (Siolim) गेले पाच दिवस अनिमयीत पाण्याचा पुरवठा होत असून त्यामुळे स्थानिक नागरिक (Local citizen) त्रस्त झाले आहेत . दरम्यान चोवीस तासांच्या आत याभागातील पाण्याचा पुरवठा (Water supply) सुरळीत न झाल्यास स्थानिक  पंचायत मंडळाच्या सहाय्याने येत्या बुधवारी  बायकांमुलांसहित रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन करण्याचा ठाम  निर्धार स्थानिक शिवोली तसेच सडये पंचायत मंडळांकडून घेण्यात आला आहे.  जुनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झालेला आहे  त्यांचप्रमाणे तिल्लारी (Tillari Dam) पासून ते आमठाणे (Amthane Dam) धरणांची पाण्याने दुतडी भरुन ओतत असतांना देखील बार्देशातील शिवोलीतच पाण्याचा पुरवठा होत नसल्याबद्दल शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर तसेच सडयेंचे सरपंच निलेश वायंगणकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांशी बोलणी केली असतां त्यांच्याकडून पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचे सांगितले जाते तर शिवोलीतच पाण्याचा अनियमित पुरवठा का ? असा संतप्त सवाल मार्ना प्रभागाचे पंच सदस्य विलीयम फर्नाडीस (William Fernandes) यांनी यावेळी उपस्थित केला. (Locals suffer due to irregular water supply in Sadayen Siolim)

दरम्यान, विद्यमान आमदार विनोद पालयेंकर यांना कमी लेखण्यासाठी शिवोलीतीलच  कांही पडेल  राजकारण्याकडून साबांखात्याच्या स्थानिक कामगारांना हाताशी धरून खेळण्यात येत असलेला  हा कुटील डाव असल्याचा संशय शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर यांनी दै. गोमंतकशी खाजगीत बोलतांना व्यक्त केला आहे.  बुधवारपर्यत येथील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महिलां-मुलांसह रस्त्यावर उतरणारच असा ठाम निश्चय यावेळी शिवोली- सडयें पंचायतींकडून करण्यात आला आहे. यावेळी मार्ना प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT