Kaloba Devsthan Morjim Casino Dainik Gomantak
गोवा

Morjim: मोरजीत 'कॅसिनो'ला थारा नाही! आमदार आरोलकरांचा स्थानिकांना पाठिंबा; परवाने मागे घ्‍यायची मागणी

Morjim Casino Dispute: कान्नाईक वाडा मोरजी येथील श्री काळोबा देवस्थान परिसरात कॅसिनो उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. आपण स्थानिकांसोबत आहे, असे आमदार जीत आरोलकर यांनी स्‍पष्‍ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim Casino Dispute

मोरजी: कान्नाईक वाडा मोरजी येथील श्री काळोबा देवस्थान परिसरात कॅसिनो उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. आपण स्थानिकांसोबत आहे, असे आमदार जीत आरोलकर यांनी स्‍पष्‍ट केले. स्थानिकांना एखादा प्रकल्प नको असेल तर आपण स्थानिकांसोबत राहणार आहे.

शिवाय या परिसरात इमारत उभारण्यासाठी दिलेली परवाने त्वरित मागे घ्यावे यासाठी आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि संबंधित खात्याला पत्र दिले आहे, अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

कान्नाईक वाडा मोरजी येथील श्री काळोबा देवस्थान परिसरात हॉटेलवजा कॅसिनो उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्‍या आहेत. शिवाय त्या परिसरातील मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेण्यासाठी झपाटा लावलेला आहे.

त्यामुळे स्थानिकांची जी काही घरे आहेत आणि ही घरे कॅसिनोसाठी अडथळा ठरत असलेली घरेही जमीन प्लान वरून नाहीशी केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. आमचा या कॅसिनोला विरोध असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे ज्या दोन-चार मोठ्या विहिरी होत्या त्यांचे पाणी आटले आहे. शिवाय विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. हा प्रकार जर थांबवला नाही तर रस्त्यावर येऊन आम्ही आवाज उठवणार, असा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT