Camurlim Residents Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival 2024: कामुर्ली ग्रामस्थांच्या लढ्याला यश! 'सनबर्न'चा प्रस्ताव सर्वांनुमते फेटाळला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Camurlim Comunidade Meeting For Sunburn Festival 2024

म्हापसा : स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेत वादग्रस्त सनबर्न या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक’ महोत्सवाच्या आयोजनाचा प्रस्ताव कामुर्ली कोमुनिदादने आपल्या सर्वसाधारण बैठकीत सर्वांनुमते फेटाळला.

आज रविवारी सकाळी सुमारे दीड तास चाललेल्या कोमुनिदाद (Comunidade) गावकारांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत ‘सनबर्न’ला विरोध करणारा हा ठराव एकमताने घेण्यात आला. दरम्यान, कामुर्ली गावात सनबर्न नको, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून स्थानिकांनी एल्गार पुकारलेला. अखेर ग्रामस्थांच्या या लढ्याला यश मिळाले. कामुर्ली कोमुनिदादने आपली जागा नाकारल्याने सनबर्न आयोजकांना ईडीएमच्या जागेसाठी आता इतरत्र शोध घ्यावा लागणार आहे.

कामुर्ली कोमुनिदादने रविवारी (ता.६) सकाळी १०.३०वा. कामुर्ली पंचायतीच्या सभागृहात आपल्या गावकारांची (सदस्य) बैठक बोलावली होती. कोमुनिदादच्या जागेत सनबर्न आयोजनासाठी परवानगी द्यावी, या आशेचा प्रस्ताव ‘स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड’मार्फत उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांकडे पाठविला होता. त्यांनी हा प्रस्ताव नंतर कामुर्ली कोमुनिदादकडे पुढे पाठवला. त्यानुसार कामुर्ली कोमुनिदादने गावकारांशी चर्चेसाठी ही बैठक बोलावली होती. एकूण १९८पैकी ६८ गावकार बैठकीस हजर होते. कामुर्ली कोमुनिदादचे अध्यक्ष वासुदेव नाईक गावकर तसेच ॲटर्नी हरी प्रभू यांनी सांगितले की, सनबर्नला गावात परवानगी देऊ नये, असा ठराव मंजूर केला.

माध्यम प्रतिनिधींनाही मज्जाव

बैठकीत कामुर्ली कोमुनिदादच्या गावकारांव्यतिरिक्त इतर कुणालाच सभागृहात प्रवेश नव्हता. माध्यम प्रतिनिधींनाही बैठकीत एण्ट्री नव्हती.

सभागृहाबाहेर पोलिस फौजफाटा तैनात होता.

कामुर्ली पंचायत सभागृहाबाहेर लोकांच्या हातात सनबर्न नको, अशा आशयाचे फलक होते.

सनबर्नचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर ग्रामस्थांचा फटाके फोडून तसेच एकमेकांना हस्तांदोलन करून आनंदोत्सव.

एका गावकाराच्या पत्नीला बैठकीत आतमध्ये सोडले नाही. त्यामुळे सभागृहाबाहेर काहीवेळ तणावाची स्थिती.

बैठकीत गावकाराव्यतिरिक्त इतर कुणालाच परवानगी नाही, असे कोमुनिदादकडून अखेर स्पष्ट.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वेलिंगकरांना अटक करा

Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या 'दुसऱ्या' सभेला मान्यता नाही! विद्यमान समितीवर विरोधक नाराज

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त काही भागात अनियमित पाणीपुरवठा! चेंबर जोडकामावेळी जलवाहिनी फुटली

Ramani Marathon 2024: रामाणी मॅरेथॉन होणार तीन नोव्हेंबरला! युवा धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा दणदणीत विजय! नागालँडला २८६ धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT