Locals gathered at Cuncolim police station and demanded action against the headmaster and the teacher in the case of student beating Dainik Gomantak
गोवा

Student Assault Case: विद्यार्थिनी मारहाण प्रकरण, कुंकळ्ळी पोलिस ठाण्यावर स्थानिकांचा 'धडक मोर्चा'; मुख्याध्यापिकेसह वर्गशिक्षिकेच्या अटकेची मागणी

Goa Crime News: मुलांच्या भांडणावेळी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर वेळीच उपचार न केल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली.

गोमन्तक डिजिटल टीम

मुलांच्या भांडणावेळी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर वेळीच उपचार न केल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली. त्यातच पोलिसांनी गेले सहा दिवस याप्रकरणी तक्रारही दाखल करून न घेतल्यामुळे संतप्त लोकांनी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेसह वर्गशिक्षिकेला अटक करण्याची मागणी केली. अखेर लोकांच्या दबावामुळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून संशयितांवर कारवाईची ग्वाही दिली.

याप्रकरणी वेरोडा येथील सेंट अँथनी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिकेला त्वरित अटक करा, अशी मागणी करत कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर आज मोठा जमाव जमल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. सेंट अँथनी प्राथमिक विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे नऊ वर्षीय विद्यार्थिनीच्या जीवावर बेतल्याचा आरोप संतप्त जमावाने केला.

वेरोडा येथील सेंट अँथनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित वर्गशिक्षिकेला अटक न केल्यास पोलिस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जमावाने बुधवारी दिला होता. त्यावेळी पोलिस अधीक्षक संतोष देसाई तसेच इतर अधिकाऱ्यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. सूर्यास्तानंतर महिलांना अटक करणे शक्य नसल्याने उद्या (ता. ३) सकाळी संशयित शिक्षिकांना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे पोलिस उद्या कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शुक्रवारी (ता. २७ सप्टेंबर) या शाळेतील तिसरीच्या वर्गातील मुलांमध्ये भांडण झाल्याने याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे डोके आपटल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. तिला गोमेकॉत दाखल केले होते. तिच्या मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया केली असून प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही मुलगी बेशुद्ध पडली असतानाही तिला इस्पितळात नेण्याची तसदी शाळेने घेतली नाही. जखमी विद्यार्थिनीला इस्पितळात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्याचे सौजन्यही शाळा व्यवस्थापन वा शिक्षकांनी न दाखविल्याने या मुलीची प्रकृती बिघडली.

मुख्याध्यापिका, शिक्षिकेला अटक करा

पीडित मुलीच्या वडिलांनी घटना घडली, त्याच दिवशी (शुक्रवारी) कुंकळ्ळी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली होती. मात्र, सहा दिवस झाले, तरी पोलिसांनी तक्रार नोंद करून न घेतल्यामुळे लोकांचा संयम सुटला आणि आज जमावाने पोलिस स्थानकावर धडक दिली. संबंधित शाळेवर पोलिस आणि शिक्षण खात्याने कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत जमावाने पोलिसांना घेरले. शाळा व्यवस्थापन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असून पोलिसांनी दबावापोटी या घटनेची नोंद घेतली नसल्याचा आरोप जमावाने केला.

सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ

शाळा व्यवस्थापन पोलिसांना हाताशी धरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच पालक व पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांना धमकावून शाळाप्रमुख खोट्या सह्या घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले नाहीत, असा आरोप करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT